एक्स्प्लोर

Heavy Rain : मुसळधार पावसाची दाणादाण! पावसानं रस्ताच वाहून नेला; पाण्याच्या प्रवाहातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास 

Rain Update : गेल्या कित्येक दिवसांपासून दांडी मारून बसलेल्या वरुणराजाने अखेर विदर्भातील (Vidarbha Weather Update) काही जिल्ह्यांना अक्षरक्ष: झोडपून काढले आहे.

Maharashtra Rain Update : गेल्या कित्येक दिवसांपासून दांडी मारून बसलेल्या वरुणराजाने अखेर विदर्भातील (Vidarbha Weather Update) काही जिल्ह्यांना अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं (IMD) वर्तवविलेले अंदाजानुसार आजपासून पुढील पाच दिवस देखील विदर्भात मुसळधार पावसाचा (Heavy Rain)अंदाज आहे. तर मागील दोन दिवसांमध्ये भंडारा (Bhandara) जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain) सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले. अशातच या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला देखील बसला आहे.

पाण्याच्या प्रवाहातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास 

तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ते पवनी या मार्गावरील जुनोना गावाला जोडणाऱ्या मार्गावरील रस्ता अक्षरशः पाण्यात वाहून गेला आहे. पवनी तालुक्यातील आसगाव परिसरातील जुनोना आणि परिसरातील पाच ते सहा गावांना जोडणाऱ्या मार्गावर लहान पुलं असल्यानं दरवर्षी पावसाळ्यात जोरदार पावसानंतर हा मार्ग बंद पडत होता. त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून इथं मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. मात्र, काम संथगतीनं असल्यानं अद्यापही काम रखडलेलं आहे. अशात रहदारीसाठी तयार करण्यात आलेला रस्ता दोन दिवसात पडलेल्या जोरदार पावसाच्या प्रवाहात वाहून गेलाय. आज सकाळी रस्ता वाहून गेल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली. मात्र, नागरिकांना शेती कामाकरिता जाणं गरजेचं असल्यानं अनेकांनी या प्रवाहित पाण्यातून जीवघेणा प्रवास करून पैलतीर गाठलं आहे.

पुढील पाच दिवस विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट

भारतीय हवामान खात्यानं विंदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज भंडारा, गोंदिया नागपूर, चंद्रपुर, गडचिरोलीला यलो अलर्ट तर उद्या 13 जुलैलीला  पुढील बुलढाणा, वाशिम अकोला वगळता उर्वरित विदर्भला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच त्यानंतर पुढील तीन दिवस संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट कायम असणार आहे. मागील दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. पुढील पाच दिवस कुठं हलक्या, कुठं मध्यम तर कुठं विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. असे असले तरी विदर्भात अद्याप दमदार पावसाची प्रतिक्षाच असल्याने बळीराजा मोठ्या चिंतेत अडकला आहे.

गोंदियात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी

गोंदिया जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळं उकडा निर्माण झाला होता. मात्र, दुसऱ्या दिवशीही सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या हजेरीनं जिल्ह्यातील वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्यात. या पावसामुळे शेतीच्या कामाला आता वेग येणार असल्याने बळीराजा आनंदी असल्याचे चित्र आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
Pune News : जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
Delhi Election Result 2025 : दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?
दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?
Delhi Election Results 2025: PM मोदींच्या 'त्या' कृतीमुळे  दिल्लीची निवडणूक शेवटच्या क्षणी कशी फिरली? 'आप'च्या नेत्याचं मोठं वक्तव्य
'या' तीन गोष्टींमुळे दिल्ली विधानसभा निवडणूक शेवटच्या क्षणी फिरली? 'आप'च्या नेत्याचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Arvind Kejriwal Defeated : अरविंद केजरीवाल यांचा पराभव,  'आप'ला सर्वात मोठा धक्का! Delhi Result 2025Delhi Election Result 2025 : दिल्लीत आम आदमी पार्टी का हरतेय? Sarita Kaushik EXCLUSIVE ABP MajhaDelhi Election Result 2025 : भाजपचा विजय, आपचा पराभव ; Rajiv Khandekar यांचं सखोल विश्लेषण ABP MajhaDelhi Assembly Election Result : दिल्लीत काँग्रेसला पुन्हा नाकारलं? कारणं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
Pune News : जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
Delhi Election Result 2025 : दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?
दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?
Delhi Election Results 2025: PM मोदींच्या 'त्या' कृतीमुळे  दिल्लीची निवडणूक शेवटच्या क्षणी कशी फिरली? 'आप'च्या नेत्याचं मोठं वक्तव्य
'या' तीन गोष्टींमुळे दिल्ली विधानसभा निवडणूक शेवटच्या क्षणी फिरली? 'आप'च्या नेत्याचं मोठं वक्तव्य
Video : कारवर भारत सरकारची नेमप्लेट अन् रशियन तरुणी मांडीवर बसवून ड्रायव्हिंग; ताबा सुटून कारने स्कुटरला धडक देताच रशियन तरुणीने...
Video : कारवर भारत सरकारची नेमप्लेट अन् रशियन तरुणी मांडीवर बसवून ड्रायव्हिंग; ताबा सुटून कारने स्कुटरला धडक देताच रशियन तरुणीने...
चंद्रभागेच्या तीरी..उभा मंदिरी!  माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो वारकऱ्यांची मांदियाळी, चंद्रभागेत स्नानासाठी मोठी गर्दी,  पहा Photos
चंद्रभागेच्या तीरी..उभा मंदिरी! माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो वारकऱ्यांची मांदियाळी, चंद्रभागेत स्नानासाठी मोठी गर्दी, पहा Photos
Delhi Election Result 2025 : दिल्लीत आप अन् काँग्रेस पिछाडीवर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोघे एकत्र लढले असते तर..
दिल्लीत आप अन् काँग्रेस पिछाडीवर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोघे एकत्र लढले असते तर..
Delhi Election Result 2025: दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना दिला झटका; आपचा पराभव अन् भाजपाच्या विजयामागील 5 मोठी कारणं
दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना दिला झटका; आपचा पराभव अन् भाजपाच्या विजयामागील 5 मोठी कारणं
Embed widget