एक्स्प्लोर

Maharashtra Rain Update: पावसाचा हाहाकार! सातारा, रायगडमध्ये गावावर डोंगर कोसळले! दहापेक्षा अधिक मृत्यू, अनेक घरं गाडली

Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सातारा आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी दरडी कोसळून 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील काही शहरं आणि गावं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सातारा आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी दरडी कोसळून 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

Maharashtra Rains LIVE : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, डेक्कन आणि पुण्यातील पेठांना जोडणारा भिडे पुल वाहतुकीसाठी बंद

सातारा जिल्ह्यातील कोंडावळे गावात माळीण सारखी मोठी दुर्घटना 
सातारा जिल्ह्यातील कोंडावळे या गावात माळीण सारखी मोठी दुर्घटना काल सायंकाळी घडली. या दुर्घटनेत जवळपास पंचवीस घरं गाडली गेली आहेत. डोंगर तुटल्याचे आणि गावाकडे सरकत येत असल्याचे मोठे आवाज काही ग्रामस्थांना दिसले आणि ही ग्रामस्थ मंडळी घरातून बाहेर पळत सुटली. यामुळं अनेक लोकं या मोठ्या दुर्घटनेतून वाचली. या दुर्घटनेत जवळपास 25 घरं गाडली गेली तर 27 लोक बाहेर काढली. मात्र अद्यापही दोन जण यामध्ये अडकलेले आहेत. यातील एका महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. 

Maharashtra Rain Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्र्यांना फोन; कोकणातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा

पाटण तालुक्यात दरड कोसळून चार घरे ढिगाऱ्याखाली 

सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात दरड कोसळून सात ते आठ घरे ढिगाऱ्याखाली गेली आहेत.  पाटण तालुक्यातील मिरगाव गावावर डोंगर कोसळला. यात सात ते आठ घरं गाडली गेल्याची माहिती आहे. तर पंधरा ते वीस घर घरांचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळे गावात हाहाकार उडाला. यातून एका कुटुंबाला बाहेर काढण्यात यश आलं आहे. या  कुटुंबातील एका बालकाचा मृत्यू झाला आहे. या गावाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने मदतकार्यात अडथळा येत आहे. 
 
रायगडमधील पोलादपूर सुतारवाडी परिसरात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू
पोलादपूर सुतारवाडी परिसरात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रूमकडून देण्यात आली आहे. पाच लोक अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. चार जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. या घटनेबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दुजोरा दिला आहे. या गावांना जोडणारे पितळवाडी-उमरठ फाटा पूल तसेच उमरठ फाटा ते साखर पूल देखील वाहून गेल्यामुळे मदत यंत्रणा पोहोचू शकत नसल्याची माहिती आहे.  

तर रायगडमधील  महाड तालुक्यातील तळीये गावातील कोंडाळकर वाडीवरही मोठी दरड कोसळली आहे. दरड दुर्घटना दोघांचे मृतदेह सापडले आहेत तर 2 जखमींना बाहेर काढल्याची प्राथमिक माहिती आहे. हा दुर्गम डोंगराळ भाग असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
गौतमी गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
गौतमी गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Embed widget