एक्स्प्लोर

Maharashtra Rain : आज मुंबईसह रायगड, पालघर पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. रात्रीपासूनच मुंबईसह, ठाणे परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे.

Maharashtra Rain : हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. रात्रीपासूनच मुंबईसह, ठाणे परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच पुणे, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज कोकणातील रायगड तसेच ठाणे, पालघर, मुंबई आणि पुण्याला पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
 
दोन दिवसांपासून मुंबईसह पुणे, रायगड, रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, वर्धा आणि बुलढाणा या जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. येत्या तीन दिवसांतही मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईत सकाळच्या सुमारास ऊन येते आणि सायंकाळनंतर आभाळ भरून पाऊस सुरू होतो असे वातावरण आहे. नाशिक नंदूरबार, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पिकांसाठी पावसाबरोबर पुरेशा सूर्यप्रकाशाचीही गरज असते. परंतू, गेले काही दिवस सतत ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहेत. अशा वातावरणामुळं शेंगअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रीय राहणार

पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.

ऑरेंज अलर्ट म्हणजे नेमकं काय?

कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस असेल त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून दिला जातो.  ऑरेंज अलर्टमध्ये, रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते.  ऑरेंज अलर्टचा अर्थ त्या भागात कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
. धक्कादायक! घरात लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण, रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल 
. धक्कादायक! घरात लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण, रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल 
ॲक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली, नाशिक TCS प्रकरणावरुन अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
ॲक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली, नाशिक TCS प्रकरणावरुन अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Gold : 2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले,अक्षय तृतीयेपूर्वी सोन्यात चढ-उतार; पुढे काय होणार, मोतिलाल ओसवालचा अहवाल काय सांगतो?
2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले, पुढं काय होणार,मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचा अहवाल काय सांगतो?
Embed widget