(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Rain : कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा नदी मोसमात तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग
गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सलग कोसळणाऱ्या पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिलाला आहे. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे.
Kolhapur Rain : गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सलग कोसळणाऱ्या पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिलाला आहे. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी 31 फुट 2 इंच इतकी आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट, तर धोका पातळी 43 फुटांवर आहे. दरम्यान, पाणी पातळीत वेगाने वाढ झाल्याने पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आली आहे.
राधानगरी धरणाचा एक दरवाजा सुरु
धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या दमदार पावसाने राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. पाॅवर हाऊस आणि उघडलेल्या दरवाज्यातून मिळून 3 हजार 28 हजार क्युसेसने भोगावती नदी पात्रामध्ये विसर्ग सुरु आहे.
जिल्ह्यातील 49 बंधारे पाण्याखाली
- पंचगंगा नदी - शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
- भोगावती नदी - तारळे, शिरगाव, सरकारी कोगे, खडक कोगे, राशिवडे, हळदी
- कासारी नदी - यवलूज, ठाणे, आळवे, पुन्हाळ, तिरपण, वाघोली
- दुधगंगा नदी - सिद्धनेर्ली, दत्तवाड, सुळकूड
- ताम्रपर्णी नदी - चंदगड, कुर्तनवाडी चंदगड, हलगरवाडी, कोकरे, माणगांव,
- घटप्रभा नदी - पिळणी, बिजूर भोगाली, कानडे सावर्डे, हिंडगाव
- वेदगंगा नदी - निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी, शेळोली, शेणगाव
- हिरण्यकेशी नदी - निलजी, ऐनापूर, गिजवणे, साळगांव
- कुंभी नदी - कळे, शेणवडे, मांडूकली, काथळी
- वारणा नदी - चिंचोली, माणगाव
- अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेक विसर्ग
पश्चिम महाराष्ट्रात होत असलेल्या सर्वदूर होत असलेल्या पावसाने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. अलमट्टी धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातून दीड लाख क्युसेकने विसर्ग कृष्णा नदी पात्रात सुरु आहे. धरणात 1 लाख 19 हजार 85 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे.
कोयना धरणातूनही विसर्ग वाढला
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणात 38 हजार 10 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने 14 हजार 811 क्युसेक कोयना नदी पात्रात होत आहे. कोयना धरणामध्ये सध्या 103.84 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यात काल दिवसभरात सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 51.2 मिमी झाला. हातकणंगले- 1.6 शिरोळ -1 पन्हाळा-6.3 शाहूवाडी- 18.4 राधानगरी- 9.6 गगनबावडा- 51.2 करवीर 5.6 कागल- 2.6 गडहिंग्लज-2.2 भुदरगड 9.8 आजरा-14.4 चंदगड- 12 मिमी पावसाची नोंद झाली.
इतर महत्वाच्या बातम्या