पुढील 4 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार, कोणत्या जिल्ह्यात किती पडणार पाऊस? सविस्तर माहिती एका क्लिकवर
आजपासून पुढील 4 दिवस म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी वर्तवली आहे.
Maharashtra Rain News : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान, आजपासून पुढील 4 दिवस म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी वर्तवली आहे. 4 ऑगस्टपर्यंत राज्यात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.
या 14 जिल्ह्यात पडणार अति जोरदार पाऊस
माणिकराव खुळे यांना दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 14 जिल्ह्यात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील मुंबईशहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 14 जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
16 जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
6 जिल्ह्यात पडणार मध्यम ते जोरदार पाऊस
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे. यामध्ये सांगली, सोलापूर, धाराशिव, बुलढाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे.
5 ऑगस्टपासून कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार
दरम्यान, 5 ऑगस्ट (आमावस्ये) पासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पूर्ण नव्हे पण काहीसा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता देखील माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
आज राज्यातील 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा
आज राज्यात कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणातील रायग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह ठाणे सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या: