Pune Dam Water Level: पुणेकरांना मोठा दिलासा! जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 'इतका' पाणीसाठा, पाहा आकडेवारी
Pune Dam Water Level: पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे.
Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यासह (Pune Rain Update) परिसरातील धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 90 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा आहे.
पुणे जिल्ह्यातील पानशेत, वरसगाव, टेमघर या तिन्ही धरणात सध्या पाणीसाठा 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने या धरणामध्ये 75 टक्के पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी याच काळात चार ही धरणात 79.66 टक्के इतका पाणीसाठा होता. यावर्षी याच काळात चारही धरणातील पाणासाठा हा मिळून 89.87 टक्के इतका आहे.
जुलै महिन्यामध्ये राज्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. पुणे जिल्ह्यासह (Heavy Rain) घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठा पाऊस (Heavy Rain) होत आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी प्रश्न मिटला आहे. पुणे जिल्ह्याला (Heavy Rain) पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांत 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.
धरणातील पाणीसाठा किती?
खडकवासला धरणामध्ये 75.90 टक्के पाणीसाठा (Pune Water Storage) आहे. पानशेत धरणात 91.1 टक्के पाणीसाठा आहे. वरसगाव धरणात 90.36 टक्के, तर टेमघर धरणात 92.40 टक्के इतका पाणीसाठा आहे. राज्यात जुलैमध्ये सरासरीपेक्षा 138 टक्के जास्त पाऊस झाला आहे. पुण्यात पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पुण्यात पावसाने घेतली विश्रांती
पुण्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातलं. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, अनेक ठिकाणचं जनजीनव विस्कळीत झालं. त्यानंतर पुन्हा पावासाने विश्रांती घेतली आहे. गेली दोन दिवस काही प्रमाणात पावसाची संततधार (Heavy Rain) सुरू होती. आज पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ४ ते ५ दिवस राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय.
धरणातील पाणीसाठा खालीलप्रमाणे
खडकवासला: 75.60 टक्के
पानशेत: 91.01 टक्के
वरसगाव: 90.36 टक्के
टेमघर: 92.40 टक्के