एक्स्प्लोर

मुंबईसह ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी! पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचे, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, महाराष्ट्रात कसं असेल हवामान? 

राज्यातील वातावरणात बदल (Climate Change) होत आहे. राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Rain : राज्यातील वातावरणात बदल (Climate Change) होत आहे. राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. या पावसामुळं उन्हापासून नागरिकांची सुटका झाली आहे. दरम्यान, अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांनी हवामानाच्या संदर्भात अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कारण काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भासह, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

मुंबईत शनिवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. वांद्रे, अंधेरी, बोरिवली, खास आणि गोरेगाव परिसरात सकाळपासूनच हलक्या सरी बरसल्या होत्या. आज रविवारी मुंबईसह ठाणे, पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तर काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, काही भागात अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 17 ते 20 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

कोकणात मागील 8 ते 10 दिवसांपासून पाऊस सरींवर सरी कोसळतायेत

अंदमानात दाखल झालेला मान्सून कोकणात देखील लवकरच दाखल होणार आहे. सध्या कोकणातील वातावरण मान्सूनच्या आमगमानाची चाहूल देणारं आहे. कोकणात मागील 8 ते 10 दिवसांपासून पाऊस सरींवर कोसळत आहे. काही भागात वीज कोसळून माणसं दगावनं आणि जखमी होणे अशा घटना देखील समोर आल्या आहेत. वातावरणात होत असलेला बदल आणि कोसळणारा पाऊस पाहता मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे डोळे लागले आहे. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढताना दिसून येत आहे. पण, प्रशासनानं मात्र नागरिकांना काळजी घेण्याचं, सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' भागांना हवामान विभागानं दिला इशारा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत मराठी पाट्या संदर्भात पालिकेची कडक मोहीम; दोन दिवसांत सहा हजारांवर दुकानांची झडती
Maharashtra Live blog updates: मुंबईत मराठी पाट्या संदर्भात पालिकेची कडक मोहीम; दोन दिवसांत सहा हजारांवर दुकानांची झडती, तर 205 आस्थापनांना पालिकेची नोटीस
Amit Thackeray on NEET Exam Paper Leak: ज्यांच्याकडे पैसा आहे तेच डॉक्टर बनणार का? नीट पेपरफुटी प्रकरणावर अमित ठाकरेंचा संतप्त सवाल; म्हणाले, 'शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत...'
ज्यांच्याकडे पैसा आहे तेच डॉक्टर बनणार का? नीट पेपरफुटी प्रकरणावर अमित ठाकरेंचा संतप्त सवाल; म्हणाले, 'शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत...'
Pune Accident: पुण्यात रिक्षा-फॉर्च्युनरची जोरदार धडक, रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जखमी
पुण्यात रिक्षा-फॉर्च्युनरची जोरदार धडक, रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जखमी
India Weather Forecast : मुसळधार पाऊस अन् वादळी वाऱ्याचं संकट; हवामान विभागाकडून 15 राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा; दिल्ली आणि यूपी-बिहारसह कसे असेल महाराष्ट्राचे हवामान?
मुसळधार पाऊस अन् वादळी वाऱ्याचं संकट; हवामान विभागाकडून 15 राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा; दिल्ली आणि यूपी-बिहारसह कसे असेल महाराष्ट्राचे हवामान?

व्हिडीओ

Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Kalyan Railway station Crime: कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांकडून अटक
मोठी बातमी: कल्याण रेल्वे स्थानकात खळबळजनक घटना, नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Embed widget