एक्स्प्लोर

Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान

Maharashtra Rain :  राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान

Background

Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: विदर्भात पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिकं पाण्यात असल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.

सध्या मुंबईसह, ठाणे, पालघर कोकण, मराठवाड्यातील काही जिल्हे, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. या पाण्यामुळं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.  

यवतमाळमध्ये मुसळधार, शेती पिकांचं मोठं नुकसान

यवतमाळ जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. वणी तालुक्यातील 84 नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. वणी तालुक्यातील भुरकी, जुनाड, कवडशी, सावनगी, शिवणी, चिंचोली, जुगाद या गावांना पाण्याचा वेढा आहे. घरात पाणी शिरलं आहे. जिल्ह्याच्या दोन दिवसात कोसळलेल्या पावसामुळे राळेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या रामगंगा नदीला पूर आला आहे. या  पुरामुळं झाडगाव परिसरातील शेकडो एकर जमीन खरडून गेली आहे. राळेगाव तालुक्यात मोठी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचा वेग येवढा होता शेतातील माती पूर्णपणे वाहून गेली असून केवळ मोठ मोठे दगड शेतात राहिले आहेत. इतकेच नव्हेतर या पुराच्या पाण्याने मोठे दगडही शेतात येऊन पडले.  शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर हे उभ पीक आणि माती पूर्ण पाने वाहून गेली. त्यामुळे शेतकरी पुरता खचून गेला आहे. 

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातही सध्या धो धो पाऊस कोसळताना दिसत आहे. चिपळूणमध्ये चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळं गतवर्षी अतिवृष्टीमुळे चिपळूणला महापूराचा फटका बसला. त्यात सार चिपळूण उद्ध्वस्त झालं होतं. या महापुरातील आठवणी आजही कायम आहेत.

वर्धा 

वर्धा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रसिद्ध आजनसरा देवस्थानाला पुराचा मोठा फटका बसला आहे. मंदिरात पाणी शिरल्यानं मंदिर प्रशासनाकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचं कार्य सुरु आहे. कार्यालयातील इलेक्ट्रिक वस्तू प्लायवूड आणि इतर वस्तू भिजल्यानं मोठं नुकसान झालं आहे. 
तसेच हिंगणघाट तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थानात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्यामुळे मंदिराचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कार्यालयातील कॉम्प्युटर, इलेक्ट्रिक सामान, सीसीटीव्ही मशीन, प्लायवूड यासह अनेक वस्तूंचे नुकसान झाल्यामुळे आता देवस्थानातील कर्मचाऱ्यांकडून मंदिराची साफसफाई केली जात आहे.

मंदिराच्या मागे वर्धा आणि यशोदा नदीचा संगम आहे. त्यामुळे यावर्षी मुसळधार पाऊस बरसल्यामुळं नद्यांना पूर आला आणि पुराचे पाणी हे थेट मंदिर परिसरात शिरलं आहे. यामुळं परिसराचंही आणि मंदिराच्या कार्यालयाचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

अकोला जिल्ह्यात संततधार पाऊस बरसल्याने हैद्राबाद आणि माध्यप्रदेशला जोडणारा अकोला-अकोट महामार्ग पूर्णा नदीवरील गांधीग्रामच्या पुलावरून पाणी जात असल्याने 24 तासंपासून बंद पडला होता. मात्र आता पूर ओसारल्याने वाहतूक पूर्वपदावर आली आहे.


चंद्रपूर 

चंद्रपूर शहरातील सिस्टर कॉलनी, रहेमतनगर सारख्या इरई नदी काठच्या भागात पुन्हा पुराचे पाणी शिरले आहे. गेल्या आठवड्यात पूर आल्यानंतर नुकतीच नागरिकांनी घरांची स्वच्छता केली होती. पाऊस नसताना वर्धा नदी आणि तिच्या उपनद्यांना पूर आला आहे. वर्धा-यवतमाळ जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं वर्धा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. 

बुलढाणा 

बुलढाणा जिल्ह्यातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्णा नदीला पूर आल्यामुळं लगतच्या छोट्या नदी पात्रात पुराचं बॅक वॉटर घुसल्यानं पूर्णा नदी काठच्या गावांना पूर परिस्थिचा सामना करावा लागत आहे. मलकापूर तालुक्यातील काळेगाव येथील विश्वगंगा नदीला आलेल्या पूर्णा नदीच्या पाण्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून काळेगाव चा संपर्क तुटला आहे. 

मराठवाड्यातही मोठं नुकसान 

गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. विभागातील जवळपास 3 लाख 38 हजार 88 हेक्टरचे नुकसान झाले असून, याचा 3 लाख 51 हजार 499 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने सुरु केली आहेत. 

11:36 AM (IST)  •  21 Jul 2022

साताऱ्यातील भांबवली गावाकडं जाणाऱ्या रस्त्यावर कोसळली दरड, दोन वृद्ध आजोबांनी रस्ता केला मोकळा

Satara rain : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जो काही जोरदार पाऊस कोसळला आहे, त्यामुळे या ठिकाणी दरडी कोसळू लागल्या आहेत. कास शेजारील भांबवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही दिवसापूर्वी दरड कोसळली होती. यामुळं भांबवली गाव आणि वजराई धबधब्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. दरड कोसळली असल्यानं या रस्त्यावरुन ये जा करताना ग्रामस्थ आणि पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जाव लागत होतं. ग्रामस्थ आणि पर्यटकांची ही अडचण लक्षात घेऊन दोन वयोवृद्ध नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेची वाट न पाहताच ही दरड हटवून रस्ता मोकळा केला आहे. 65 वर्षाचे चंद्रकांत मोरे आणि पन्नास वर्षाचे बळीराम सपकाळ यांनी स्वतः हातात कुदळ आणि फावडे घेऊन भर पावसात मेहनत घेऊन ही दरड बाजूला केली. या दोन्ही आजोबांनी केलेल्या या कामाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केलं जातं आहे. या दोन्ही आजोबांची प्रेरणा घेऊन शासकीय यंत्रणेने देखील अशाच प्रकारचे तत्परतेने काम करण्याची गरज असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.

11:08 AM (IST)  •  21 Jul 2022

अंबोलीत यावर्षी आत्तापर्यंत 3450 मिलीमीटर पावसाची नोंद

Sindhudurg Rain : सध्या राज्याच्या विविध भागात धो धो पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडं शेती पिकांचं देखील या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या अंबोलीत यावर्षी आत्तापर्यंत 3450 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळं धबधबे ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. 


10:11 AM (IST)  •  21 Jul 2022

हिंगोली जिल्ह्यात संततधार पाऊस, औंढा नागनाथ तलाव ओव्हरफ्लो

Hingoli Rain : हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळं ओढे, नाले, नद्या तुडुंब वाहत आहेत. तसेच देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ शहराचा पाणीपुरवठा या तलावावर अवलंबून आहे. याशिवाय वगरवाडी, वगरवाडी तांडा या भागातील शेती देखील याच तलावाच्या सिंचनाखाली येते. औंढा नागनाथ तालुक्यामध्ये गेल्या चार दिवसापासून दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं औंढा नागनाथ तलाव ओव्हरफ्लो झाला असून, हा तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं पर्यटक या पाण्याखाली येवून आनंद घेताहेत.

10:08 AM (IST)  •  21 Jul 2022

कोयनेत 60 टीएमसी पाणी साठा, शेतीकामांना वेग

 
 
 
सातारा जिल्ह्याच्या पुर्व भागात पावसानं दडी मारली आहे. तरी पश्चिमेकडील भागात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळं शेती कामांना वेग आला आहे. तर पाऊस कमी झाल्यानं धरणातील पाण्याची आवकही कमी झाली असून, कोयनेत 60.20 टीएमसी पाणी साठा झाला आहे. तसेच नवजा येथे 43 आणि महाबळेश्वरला 28 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
09:04 AM (IST)  •  21 Jul 2022

Exclusive : आदित्य ठाकरेंनी त्र्यंबक तालुक्यातील शेंद्रीपाडा येथे उभारलेला लोखंडी पुराच्या पाण्यात वाहून गेला

Aditya Thakaray : आदित्य ठाकरे यांनी त्र्यंबक तालुक्यातील शेंद्रीपाडा येथे बांधलेला लोखंडी साकव पुराच्या पाण्यात वाहून गेला. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांची जीवघेणी कसरत पुन्हा सुरू आहे. विशेष म्हणजे आज आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget