Pune : पुणे शिवाजीनगर बसस्थानकावर प्रवाशांचा मोठा गोंधळ, एसटी बसचे वेळापत्रक कोलमडले; प्रवाशांचे प्रचंड हाल
Pune ST Bus News : काल रात्री पुणे शिवाजीनगर बसस्थानकावर प्रवाशांचा मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
Pune ST Bus : राज्यात परतीच्या पावसानं (Heavy Rain) धुमाकूळ घातला असून त्यात पुण्याला (Pune) तर चांगलचं झोडपून काढलं आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. अशातच काल रात्री पुणे शिवाजीनगर बसस्थानकावर प्रवाशांचा मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
पुणे शिवाजीनगर बसस्थानकावर मोठा गोंधळ
दिवाळी सण अवघ्या दोन दिवसांवर असल्याने चाकरमान्यांना त्यांच्या निश्चितस्थळी पोहचण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मंगळवारच्या रात्री पुणे शिवाजीनगर बसस्थानकावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान, पुण्यात काल अक्षरशः पावसाने हैदोस घातल्याचं पाहायला मिळालं. अशातच दिवाळीनिमीत्ताने राज्य सरकारचे एसटी बसचे नियोजन कोलमडले असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कारण एसटी बसचे नियोजन तसेच वेळापत्रक कोलमडल्याने गाड्या उशीराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ काल शिवाजीनगर बस स्थानकावर दिसून आला. वेळेवर बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसले.
प्रवाशांना हाकलून लावलं
बस का लेट झाली? काही प्रवासी विचारायला गेले असता स्वारगेट एसटी स्टँड येथील कर्मचाऱ्यांनी त्यांना हाकलून लावलं. आम्हाला माहित नाही असे उत्तर त्यांच्याकडून दिले जात आहेत. कुठूनही समाधनकारक उत्तर न मिळाल्यामुळे आता नेमकं करायचं काय? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल
सोमवारी रात्रीपासून पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांचे रुपांतर नद्यांमध्ये झाले. अनेक घरे, दुकानात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. मुसळधार पावसाने काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे आणखीच हाल झाले
महामंडळाकडून दिवाळीनिमित्त भाडेवाढ
दरम्यान, दिवाळीनिमित्त एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही 20 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12 नंतर प्रवास सुरु करणा-या प्रवाशांकडून 10 टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. ही भाडेवाड 31 ऑक्टोबर पर्यत लागू राहील. एसटी महामंडळाकडून साधारणपणे 5 ते 75 रुपयांपर्यंत भाडेवाढ होणार आहे. साधी गाडी, शिवशाही या गाड्यांना भाडेवाढ लागू असेल.
इतर महत्वाच्या बातम्या