एक्स्प्लोर

नाशिक - पुणे एसटी प्रवास महागला, महामंडळाकडून दिवाळीनिमित्त भाडेवाढ, असे आहेत नवे दर

MSRTC bus ticket hike : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्यानंतर आता एसटीने भाडेवाढ केल्यानंतर प्रवाशांचा दिवाळ सण महागणार आहे.

MSRTC bus ticket hike : दिवाळीनिमित्त एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या (maharashtra state transport) परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. (MSRTC bus ticket hike). त्यानूसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही 20 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12 नंतर प्रवास सुरु करणा-या प्रवाशांकडून 10 टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. ही भाडेवाड 31 ऑक्टोबर पर्यत लागू राहील.

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्यानंतर आता एसटीने भाडेवाढ केल्यानंतर प्रवाशांचा दिवाळ सण महागणार आहे. त्याचबरोबर खिशालाही झळ पोहचणार आहे. मुंबईनंतर नाशिक विभागातून भाडेवाढ करण्यात आली आहे. यामध्ये साधी आणि शिवशाही या दोन्ही बसेसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत भाडेवाढ होणार माहेरवाशीणींना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. 

एसटी महामंडळाकडून साधारणपणे ५ ते ७५ रुपयांपर्यंत भाडेवाढ होणार आहे. साधी गाडी, शिवशाही या गाड्यांना भाडेवाढ लागू असेल. दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने दरवर्षी प्रमाणे नियमित बस फेऱ्या बरोबर वाढविण्यात येणार आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे.

दरम्यान ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे , त्या प्रवाशाकडून वाहकाव्दारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. तथापी, ही भाडेवाढ एस.टी. च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विदयार्थी पासेस संदर्भांत एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाने स्पष्ट केले नाही. तसेच १ नोव्हेबर पासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमी प्रमाणे तिकीट दर आकारले जातील अशी प्राथमिक माहिती आहे.

21 ऑक्टोबर पासून नवे दर
दरम्यान नाशिक विभागातून सुटणाऱ्या बसेसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये कळवण - औरंगाबाद पहिले 290 आता 320, कळवण-धुळे पहिले 165 आता  185, कळवण-पुणे  पहिले 425 आता 470, येवला -पुणे पहिले 350 आता 385, लासलगाव -पुणे पहिले 340 आता 375, नाशिक - पुणे साधी व शिवशाही पहिले 315 - 465 आता साधी व शिवशाही आता 345- 515, नाशिक-बोरिवली व शिवशाही पहिले 270 - 400 आता साधी व शिवशाही आता 300- 445, नाशिक -औरंगाबाद साधी व शिवशाही पहिले 295 - 440 आता साधी व शिवशाही आता 325- 485, नाशिक - मुंबई साधी व शिवशाही पहिले 270 - 400 आता साधी व शिवशाही आता 300-445, नाशिक- दादर  साधी व शिवशाही पहिले 260 - 390 आता साधी व शिवशाही आता 290-430. आशा पद्धतीने इतरही अनेक शहरातील भाडे वाढ करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaMahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे Exclusive

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Embed widget