एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : फडणवीसांसोबत विधानभवनात एन्ट्री, उद्धव ठाकरे म्हणतात, बंद दाराआड चर्चा...

Uddhav Thackeray :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधानभवनात एकत्र आले. या दोघांमध्ये चर्चादेखील झाली. त्यावर उद्धव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Uddhav Thackeray :  मागील अडीच वर्षापासून राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असा सामना रंगला आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे विधानभवनात दिसलेल्या एका चित्रामुळे राज्यात राजकीय चर्चांना  उधाण आले आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र विधानभवनात दाखल झाले. या दोन्ही नेत्यांची एकत्र एन्ट्री झाल्याने हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे, दोन्ही नेते एकमेकांसोबत हसतमुखाने संवाद करत विधानभवान दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांनी विचारले. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी संयमित प्रतिक्रिया दिली. उद्धव यांनी म्हटले की, पूर्वी खुलेपणा होता. पण हल्ली बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी ठरते असे म्हणतात. त्यामुळे जेव्हा कधीतरी, कदाचित आमची बंद दाराआड चर्चा झाली तर त्यावेळी बोलू असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. विधानभवनात मी आणि देवेंद्र फडणवीस एकाच वेळी आलो. त्यावेळी शिष्टाचारानुसार आम्ही नमस्कार, राम..राम, हॅलो.. केले. 

आजच्या या भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचा भाजपला होणारा विरोध मावळणार का, असा प्रश्न केला असता उद्धव यांनी त्याचा थेट इन्कार केला. कोणालाही नमस्कार, हाय-हॅलो हे एखाद्या हेतूनेच करावे का, असा उलटप्रश्नही त्यांनी केला.

विधानभवनात काय झाले?

आज विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले. ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवता एकमेकांशी गप्पा मारल्या. दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य होते. एकमेकांशी छान गप्पा मारत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस विधिमंडळात गेले. त्यामुळे अनेक चर्चा उधाण आले आहे.

आधी आदित्य ठाकरेंच्या लग्नावरुन मजेशीर संवाद...

दोन दिवसांपूर्वीच विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यातही लग्नावरुन मजेशीर संवाद पाहायला मिळाला होता. यानंतर आता दोन दिवसांतच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हसतखेळत गप्पा मारताना दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र आगामी काळात काही राजकीय बदल घडू शकतो का या संदर्भात आताच काही सांगता येऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक देतात. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget