एक्स्प्लोर

Naresh Mhaske : आमचा वाघ कोल्ह्या-लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडला, कायद्यानुसार आमच्या बाजूने निकाल : नरेश म्हस्के

Naresh Mhaske : आमचा वाघ कोल्ह्या लांडग्यांच्या सहवासात गुदमरला होता. तो वाघ कोल्ह्या लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडला असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश नरेश म्हस्के यांनी केलं.

Naresh Mhaske : आमचा वाघ कोल्ह्या लांडग्यांच्या सहवासात गुदमरला होता. त्या वाघाला बाहेर पडायच होतं, आज तो वाघ कोल्ह्या-लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडला असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केलं. धनुष्यबाण आणि शिवसेना (Shivsena) आम्हाला मिळालं आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद आम्हाला मिळाल्याचे म्हस्के म्हणाले. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार गुदमरला होता, तो आज बाहेर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हातात अधिकृतरित्या हिंदुत्वाचा झेंडा आला असल्याचे म्हस्के म्हणाले.

बाळासाहेबांची हिंदुत्ववादी विचारसारणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायदळी नेऊन ठेवली होती. त्यांनी लाचारी पत्करली होती असे म्हस्के म्हणाले. त्यांना माहित होतं निकाल काय येणार आहे. म्हणून ते कायम लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत होते. सहानुभूती मिळवणं ही त्यांची चाल होती असेही नरेश म्हस्के म्हणाले. सत्यमेव जयते जे म्हणतात ते आज सत्य झालं असल्याचे म्हस्के म्हणाले. 

कायद्यानुसार आमच्या बाजूने निकाल 

ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात जावं. युनोमध्ये जावं नाहीतर आणखी कुठे जायचं तिथं जावं. कायद्यानुसार आमच्या बाजूने निकाल लागला असल्याचे नरेश म्हस्के म्हणाले. ते आता पहिले पवारसाहेबांकडे गेले असतील. पवारसाहेब ज्या सूचना देतील त्याप्रमाणे ते चालणार असा टोलाही म्हस्केंनी ठाकरे गटाला लगावला.

पक्षामध्ये सगळ्यात जास्त आमदार आमचे, त्यामुळे अधिकार आम्हाला

आमचे शिवसैनिक आनंदात आहेत. देवाकडे शिवसैनिकांनी साकडं घातलं होतं. देवाने मागणी पूर्ण केली असल्याचे नरेश म्हस्के म्हणाले. लोकशाही कशाला म्हणतात, लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं. ज्यांचे आमदार जास्त त्यांना राज्यात मुख्यमंत्री बनवण्याचा अधिकार असतो. ज्यांचे खासदार जास्त असतात त्यांना या हिंदुस्थानामध्ये लोकसभेमध्ये पंतप्रधान बनवण्याचा अधिकार असतो. त्याप्रमाणे पक्षामध्ये सगळ्यात जास्त आमदार ज्यांचे आहेत, त्यामुळे आम्हाला अधिकार मिळालेला आहे. खासदार आमचे जास्त आहेत. सर्वात जास्त लोकप्रतिनिधी आमच्या समवेत आहेत. त्यामुळे लोकशाही मार्गाने अधिकार मिळाल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.

ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांना चिन्ह आणि नाव दिलं 

चिन्ह चोरलं असेल तर त्यांनी तक्रार करायची होती ना पोलिसांमध्ये. आज घटनापीठ आणि निवडणूक आयोग यांनी पोलिसांच्या रुपात काम केलं आहे. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांना चिन्ह आणि नाव दिलं असल्याचे म्हस्के म्हणाले. भावनिक विषय करायचे दिवस गेलेले आहेत हे लोकांना माहित आहे. वारसा हा रक्ताचाच नसतो तर वारसा विचारांचा असला पाहिजे असे म्हस्के म्हणाले. हिंदुत्वाची भूमिका एकनाथ शिंदे हे पुढे घेऊन जात असल्याचे ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Shiv Sena Party: एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं, निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget