एक्स्प्लोर

Bhaskar Jadhav: भास्कर जाधव यांच्या घरावरील कथित हल्ल्याचे गूढ उकलले? दिवाळीनंतर पोलिसांकडून खुलासा होण्याची शक्यता

Bhaskar Jadhav: शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या बंगल्यावर झालेल्या कथित हल्ला प्रकरणात पोलीस मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर पत्रकार परिषद पार पडणार आहे.

Bhaskar Jadhav: शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव (Shivsen leader Bhaskar Jadhav) यांच्या घरावर झालेल्या कथित हल्लाप्रकरणाचा तपास येत्या काही दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे. जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणात नाट्यमय वळण लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिवाळीनंतर तळकोकणातील राजकारणात घडामोडी घडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे. कोकणात पुन्हा शिवसेना उभारण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. कोकणात जाधव आणि राणे पिता-पुत्रांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या सभेला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी राणे यांच्यावर सडकून टीका केली होती.  त्यानंतर काही दिवसांतच जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू झाली होती. 

भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घराजवळ पेट्रोल भरलेली बाटली, स्टॅम्प आणि दगड आढळले होते. बंगल्याच्या आवारात आढळलेल्या या वस्तूंमुळे हा हल्ल्याचा प्रयत्न होता का, अशी चर्चा सुरू झाली. त्या दरम्यान जाधव यांनी आपली सुरक्षा कमी केली असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. 

पोलिसांनीदेखील या घटनेचा तातडीने तपास सुरू केला. आठवडाभरात प्रकरणाचा तपास पूर्ण होण्याची शक्यता आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस पत्रकार परिषद घेत माहिती देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जाधव यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.  या हल्ल्याबाबतचा तपास करत असताना पोलिसांनी मात्र पूर्ण गुप्तता पाळलेली आहे. कोणत्याही प्रकारची माहिती ही प्रसारमाध्यमांपर्यंत जाणार नाही अथवा सामान्यजणांमध्ये त्याबाबतची उलटसुलट चर्चा रंगणार नाही याची देखील पूर्ण खबरदारी सध्या पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यामुळे दिवाळी संपताच याबाबतच्या घडामोडी वेगाने घडू शकतात असे सूत्रांनी सांगितले. 

भास्कर जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्या प्रकरणी भास्कर जाधव यांच्याविरोधात कुडाळ, पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात जाधव यांच्याविरोधात कलम 500, 501, आणि 502 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Tanaji Sawant Dharashiv Loksabha : धाराशिवच्या जागेवरून तानाजी सावंतांची खदखद ABP MajhaTop 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 19 एप्रिल 2024 एबीपी माझाAjit Pawar Viral Statment : अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग करणार चौकशीABP Majha Headlines : 11 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Embed widget