एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Politics: मविआच्या बैठकीत ठरलं! लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार, जागा वाटपाचे काय?

Maharashtra Politics: आगामी विधानसभा लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी मविआच्या बैठकीनंतर दिली.

Maharashtra Politics:  राज्यात महाविकास आघाडी म्हणून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे एकमत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकमध्ये आज मविआची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत आगामी काळातील वाटचालीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले. 

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, भाजपचा कर्नाटकमध्ये मोठा पराभव झाला आहे. या निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत चर्चा करण्यात आली. या निकालानंतर त्यापुढील वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले. उन्हाळा कमी झाल्यानंतर पाऊसमान पाहून सभा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मविआची वज्रमूठ सभा सुरू होणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

विधानसभा-लोकसभा एकत्रितपणे लढवणार

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढवणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. या निवडणुकीतील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्षांचे नेते चर्चा करणार आहेत अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. कर्नाटक प्रमाणे मविआला महाराष्ट्रात यश मिळेल असा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, कर्नाटकच्या जनतेमध्ये भाजप विरोधात रोष होता तो मतपेटीतून व्यक्त झाला आहे. कर्नाटकमधील जनतेने मोदी-शाह यांच्यावरचा राग काढला आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. पुढील सभा पुण्यात होणार असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार पुण्यातील सभेत करणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले की, मविआत कोणतेही मतभेद नाहीत. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे नव्हे तर देशातील विरोधी पक्ष जिंकला आहे. महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होणार आहे. महाराष्ट्रातही भाजपचा पराभव होणार आहे. जसं कर्नाटकात जिंकलो...त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे. मविआमध्ये जागा वाटप होणार. त्याची चिंता इतरांनी करू नये, असेही राऊत यांनी म्हटले.   

इतर संबंधित बातमी:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
Embed widget