(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrashekhar Bawankule: ...तर उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही, घरकोंबडा बनून राहावे लागेल; बावनकुळेंचा इशारा
BJP On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपकडून या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
BJP On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता यापुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल बोलताना मर्यादा ओलांडल्या त्यांना भाजपचे (BJP) कार्यकर्ते घराबाहेर पडू देणार नाही, त्यांचा घरकोंबडा करतील असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला. देवेंद्र फडणवीसची बराबरी करण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नाही, असेही त्यांनी म्हटले.
ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री मारहाण केली. त्यानंतर आज, उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन जखमी रोशनी शिंदे यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली.
उद्धव ठाकरे यांना शेवटचा इशारा
उद्धव ठाकरे यांना भाजपचा हा शेवटचा इशारा असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंनी आपली मर्यादा ओलांडली तर भविष्यात आम्हाला आमची मर्यादा ओलांडावी लागेल. देवेंद्र फडणवीसची बरोबरी करण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नसल्याचे बोचरी टीका केली. बाळासाहेबांचे टाचणीभर ही गुण हे उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. मुलगा म्हणून सोडले तर तर उद्धव ठाकरे यांच्याकडे ना बाळासाहेबांचे विचार आहे, ना त्यांच हिंदुत्व आहे, ना तसं कर्तृत्व आहे असेही बावनकुळे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर...; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
अडीच वर्षानतंर त्यांचा काराभार पाहिल्यानंतर नेमके फडतुस कोण आहे हे जनतेला माहित आहे. फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित आहे, आम्ही तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला.
दोन मंत्री जेलमध्ये गेले आहे. जेलमध्ये गेल्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाही, जे गृहमंत्री वाझेच्या मागे लाळ घोटतात. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. अडीच वर्षे घरात बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. आम्हाला तोंड उघडायला लावू नका.. हा त्यांचा थयथयाट आहे याला उत्तर देण्याचे कारण नाही असेही फडणवीस यांनी म्हटले.