Maharashtra Politicis : शिंदे गटाचा 'सोशल मीडिया स्ट्राईक'; 'या' नेत्यांनी बदलले प्रोफाईल फोटो
निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलं आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांचे प्रोफाईल पिक्चर बदलले आहे.
Maharashtra Politicis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Politicis Crisis) अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळताच शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांचे प्रोफाईल पिक्चर 'धनुष्यबाण' केलं आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यानंतर स्वत: एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवरील प्रोफाईल पिक्चर बदलला आहे. त्यांनी प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे या नेत्यांनी ट्विटरवरील प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.
#NewProfilePic pic.twitter.com/Z85e8rIqBF
— Uday Samant (@samant_uday) February 17, 2023
प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केलेले नेते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उद्योगमंत्री उदय सामंत
उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
खासदार श्रीकांत शिंदे
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर
कृषीमंत्री अब्दुल सत्तार
आरोग्य मंत्री तानाजी सावंत
बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे
#NewProfilePic pic.twitter.com/rM3CYq8ZO8
— Abdul Sattar (@AbdulSattar_99) February 17, 2023
शिंदे गटात असणाऱ्या जवळपास सर्वच मंत्र्यांनी त्यांचे ट्वीटर आणि फेसबुकवरील प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह दिलं आहे. त्यानंतर नेत्यांनी फाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनीही ट्वीटरवरील प्रोफाईल पिक्चर बदलले आहे.
#शिवसेना pic.twitter.com/556laAtvIp
— Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@TanajiSawant4MH) February 17, 2023
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनीही ट्वीटरवरील प्रोफाईल पिक्चर बदलले आहे.
#NewProfilePic pic.twitter.com/rtlDCt3Tdf
— Shambhuraj Desai (@shambhurajdesai) February 17, 2023
महत्त्वाच्या बातम्या:
Shiv Sena Party: एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं, निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का