शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट झाली आहे.
Sharad Pawar and Prakash Ambedkar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट झाली आहे. इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाच्या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीला विशेष महत्व आहे. वंचित बहुजन आघाडीचा अद्याप इंडिया आघाडीत समावेश नाही. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेम्स ऑफ रुपी प्रबंधाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनंतर प्रकाश आंबेडकर शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.
शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोघांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याबद्दल सर्वांनी उत्सुकता आहे. शरद पवार यांची भेट झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. दादाभाई नौरोजी यांनी त्या काळी इंग्रजांवर आरोप केला होता, की तुम्ही आम्हाला लुटताय. पण त्यांची नौरोजी यांनी मांडणी केली नव्हती. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रज भारताला कसे लुटतात हे प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या माध्यमातून सांगितले. त्या प्रॉब्लेम्स ऑफ रुपी प्रबंधाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आयोजीत कार्यक्रमाला मला बोललावले होते असे आंबेडकरांनी सांगितले.
पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही घडेल असं वाटत नाही
कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी कॉफी घेण्याची विनंती केली. त्यावेळी तिथे शरद पवारही होते. आम्ही दहा ते बार जण होतो. यावेळी आम्ही सर्वांनी मिळून कॉफी घेतल्याचे शरद पवार म्हणाले. इंडिया आघाडीच्या प्रवेशा संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळं मी त्या कोणत्याही मुद्द्यावर भाष्य करणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही घडेल असं मला वाटत नसल्याचे आंबेडकर म्हणाले. माझा कायम भाजपला विरोध आहे.
भाजप विरोधात लढण्यासाठी विरोधकांच्या आघाडीला इंडिया नाव देण्यात आलं आहे. या आघाडीत प्रकाश आंबेडकर हे सहभागी होणार की नाही, याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. यावर विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. अशातच प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची आज भेट झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: