शरद पवारांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल, म्हणाले उपमुख्यमंत्रिपदही कंत्राटी पद्धतीनं द्या
Sharad Pawar and Prakash Ambedkar: शरद पवारांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्ला चढवला आहे. उपमुख्यमंत्री पदही कंत्राटावर द्या, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला आहे.
Maharashtyra Politics: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची वायबीचव्हाण सेंटर येथे भेट झाली. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाच्या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचा अद्याप इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही. शरद पवारांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्ला चढवला आहे. उपमुख्यमंत्री पदही कंत्राटावर द्या, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेस्म ऑफ रुपी प्रबंधाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनंतर प्रकाश आंबेडकर, शरद पवार यांच्या भेटीला गेलं. त्यावेळी काही वेळ शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये चर्चाही झाली. शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी थेट महाराष्ट्र सरकारवर हल्ला चढवला आहे.
उपमुख्यमंत्रिपदही कंत्राटी पद्धतीनं द्या : प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "कंत्राटी भरतीसंदर्भातील निर्णय धळूफेक करणारा. यासंदर्भात मोर्चे निघत आहेत, आंदोलनं सुरू आहेत, उपमुख्यमंत्रिपदही कंत्राटी पद्धतीनं द्या, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला आहे.
थोरल्या पवारांसोबतच्या भेटीत काय घडलं? आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं...
प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, "आयोजकांनी चांगला कार्यक्रम घेतला. प्रॉब्लेम ॲाफ रुपी, या पुस्तकाला 100 वर्ष पूर्ण झाली. त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे मी आलो. कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी मला कॅाफीसाठी बोलावलं. शरद पवार देखील होते. आम्ही जवळपास 12 लोक होतो. आजच्या भेटीत इंडिया आघाडीबद्दल काहीच बोलणं झालेलं नाही. 5 राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही होईल, असंही वाटत नाही." तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, "भाजपाला असं वाटत असेल की, आम्ही त्यांच्यासोबत येऊ तर मी म्हणेन की, वाट बघत बसा".
मनोज जरांगेंशी शासनानं इमानदारीनं बोलावं : प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंबाबतबी भाष्य केलं आहे. जरांगे पाटलांशी शासनानं इमानदारीनं बोलावं, चार महिने वगैरे जी मुदत दिली जात आहे. त्याबाबत जरांगे पाटील यांना मोठा पाठींबा आहे. फसवा फसवीचं राजकारण थांबवावं, नाहीतर ते त्यांच्यावर उलथेल. आरक्षण आणि जात जनगणनेचा संबंध नाही. कोणतीही जात प्रबळ नाही. बिहार जनगणनेतून समोर आलं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. तसेच, मनोज जरांगेंवर सातत्यानं टीका करणाऱ्या छगन भुजबळांबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागलं आहे. देवेंद्र फडणवीसांना जे बोलता आलं नाही, ते छगन भुजबळांना बोलायला लावलं, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला आहे.
मनोज जरांगेंनी मिळणाऱ्या पाठिंब्यात अनेकजण असे आहेत की, जे लग्न झालेले नाहीत किंवा ज्यांच्या हाताला काम नाही. सामाजिक परिस्थिती फारच गंभीर आहे. सरकारनं फसवाफसवीच राजकारण थांबवाव, नाही तर ते त्यांच्यावर उलटेल, असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.