Congress : शेगावातील काँग्रेसच्या सभेला सोनिया गांधी राहणार हजर, शरद पवार-उद्धव ठाकरेही येणार? नाना पटोलेंची माहिती
Congress : 18 नोव्हेंबर रोजी शेगाव येथे होणाऱ्या सभेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी उपस्थित राहणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाची माहिती दिली
Maharashtra Politics : 18 नोव्हेंबर रोजी शेगाव येथे होणाऱ्या सभेला (Congress) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) उपस्थित राहणार का? या 'एबीपी माझा' च्या बातमीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी हिरवा कंदील दर्शविला आहे. दरम्यान या सभेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबद्दल अजून तरी निश्चितता नसल्याची माहिती पटोले यांनी 'एबीपी माझा' च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली
भारत जोडो यात्रेमुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकतेय - पटोले
कॉंग्रेस पक्षाची आजवरची सर्वात ऐतिहासिक अशी सभा शेगावमध्ये होणार आहे तसेच भारत जोडो यात्रेमुळे (Bharat Jodo Yatra) भाजपच्या (BJP) पायाखालची वाळू सरकत आहे, त्यामुळे विरोधक राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यात्रेवर टीका करत असल्याची पटोले म्हणाले..
...तर महाविकास आघाडीचे सर्वात मोठं शक्तीप्रदर्शन ठरेल
महाविकास आघाडी स्थापन होऊन जवळपास तीन वर्ष झाली आहेत. या निमित्ताने शेगावात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा एकजूट मेळा होणार आहे. शेगाव येथे कॉंग्रेसच्या सभेत महाविकास आघाडीचे नेते एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आलेली कॉंग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सध्या विदर्भात पोहचली आहे. राहुल गांधी यांच्या शेगाव येथील जाहीर सभेला काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे तीन नेते उपस्थित राहणार असल्याचं बोललं जातंय. यापैकी सोनिया गांधी या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली. काँग्रेसने शेगावच्या सभेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिलं आहे. काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन हे नेते शेगावच्या सभेला हजर राहणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तसेच या सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहिले तर या निमित्तानं महाविकास आघाडीचे सर्वात मोठं शक्तीप्रदर्शन ठरेल.
पटोले, थोरात करणार सभेचे नियोजन
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव (Shegaon) येथे 18 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा येणार असून याच दिवशी सायंकाळी राहुल गांधी यांची जंगी सभाही होणार आहे. सभेच्या व यात्रेच्या नियोजनासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हंडोरे, यशोमती ठाकूर अशा बड्या नेत्यांसह अनेक नेते शेगावात तळ ठोकून याचे नियोजन करताना दिसून येत आहेत.
राहुल गांधी करणार भाजपवर हल्लाबोल
काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव येथे होणाऱ्या कॉंग्रेसच्या या यात्रेला जवळपास सहा लाख लोकं येणार आहेत. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्थेवरून भाजपवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
हातातले खंजीर बाजूला ठेवा, मगच बाळासाहेबांच्या स्मारकावर या; संजय राऊतांनी शिंदे गटाला थेटच सुनावलं