Jitendra Awhad : "दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है.."; जितेंद्र आव्हाडांचा शायरीतून टोला कोणाला? 'त्या' ट्विटची चर्चा
Jitendra Awhad : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक शायरी पोस्ट केली आहे. 'त्या' ट्विटची सर्वत्र चर्चा सुरू झालीय.
![Jitendra Awhad : Maharashtra Political Marathi News Jitendra Awhad Criticized To Raj Thackeray With Shayari about Loudspeaker controversy Jitendra Awhad :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/20/49b610817887fffd5a1052a965058f38_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jitendra Awhad : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंग्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तर जितेंद्र आव्हाड यांनी मनसेला आव्हान केले होते, ते म्हणाले होते की, महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आणि हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. दरम्यान, आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक शायरी पोस्ट केली आहे. "दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है" अशा शायरीची पोस्ट करत त्यांनी हा टोला मनसेला लगावला आहे.
ट्विटमधून एक शायरी पोस्ट
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमधून एक शायरी पोस्ट केली आहे. ते म्हणतात, दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, म्हणजेच शत्रू जे काम करत नाहीत ते काम मित्रांनी केले आहे. आयुष्यभर केवळ त्रास दिला आहे, असं म्हणत त्यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. मंदिरावरचे भोंगे काढा असे म्हणटल्या नंतरची नैसर्गिक प्रतिक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दुश्मन ना करे दोस्त ने
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 5, 2022
वो काम किया है
उम्र भर का गम
हमे ईनाम दिया है
तूफाँ में हमको छोड़ के
साहिल पे आ गये
तूफाँ में हमको छोड़ के
साहिल पे आ गये.
दुश्मन न करे दोस्त ने
वो काम किया है
…..
मंदिरावरचे भोंगे काढा असे म्हंटल्या नंतरची नैसर्गिक प्रतिक्रिया
राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न : आव्हाड
एका मुलाखतीत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या भूमिकेबाबत निशाणा साधला होता. आव्हाड म्हणाले होते की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही. राज ठाकरेंना अचानक वाटायला लागले की, ते बाळासाहेब होऊ शकतात. यामुळेच त्यांनी भोंग्यांचा विषय उकरून काढला. बुद्धांसारखा दुसरा कोणी झाला नाही. सम्राट अशोकांसारखा दुसरा कोणी झाला नाही. राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भोंग्यांच्या विषय काढण्यात आला आहे. काहीही केले तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाळासाहेबांसारखे होऊ शकत नाहीत, असंही आव्हाडांनी स्पष्ट केलं आहे. अशातच आज ट्विटरच्या माध्यामातून केलेल्या शायरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांविना..
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण याबाबत आवाज उठविल्यानंतर आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांचा वापराशिवाय झाली. कुर्ला येथील एससीएलआर जवळील विभागात तीन ते चार मोठ्या मशिदी आहेत. त्यामुळे इथे पहाटे 6 च्या आधीच मोठ्या आवाजात अजान होत असे. मात्र, आज या विभागात नमाज पठण झाले. पण लाउडस्पीकरवर अजान झाली नाही. दरम्यान, मुंबईमधील काही मोठ्या मशिदीच्या ट्रस्टींनी एकत्र येत पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)