एक्स्प्लोर

Rajesh Tope : कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री टोपे यांची महत्वाची माहिती; म्हणाले...

Rajesh Tope : महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का? यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. काय म्हणाले टोपे?

Rajesh Tope : भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या वाढतेय. तर महाराष्ट्रात शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली असल्याचं दिसून आलं. अशातच राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. काय म्हणाले टोपे?

कोरोनाची चौथी लाट,  हा फार मोठा विषय नाही- आरोग्यमंत्री
आरोग्यमंत्री राजेश टोपे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, कोरोनाचा आजचा आकडा पाहता 254 नवीन रुग्ण आहेत. रिकव्हरी 98 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यात कोवीडच्या चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नाही. राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार नाही. राज्यात कोरोना रुग्ण वाढत नसून लसीकरणही चांगलं झालंय. राज्यात सध्या 1950 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. हा फार मोठा विषय नाही. सध्या सर्वत्र गर्दी होत असून राजकीय मेळावे होत आहे. तरीही कोरोना रुग्णांची अपेक्षित वाढ नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आणि चौथ्या लाटेचीही शक्यता वाटत नाही.

ॲटीबॉडीजची टेस्ट करुन बूस्टर डोस घ्यावा - आरोग्यमंत्री
बूस्टर डोसबाबत केंद्राच्या सुचना आहे. त्यानुसार राज्यात बूस्टर डोस देण्यात येत आहेत. ॲंटीबॉडीजची टेस्ट करुन लोकांनी बूस्टर डोसबाबत निर्णय घ्यावा असे आरोग्यमंत्री म्हणाले. 

आरोग्य विभागाशी संबंधीत प्रश्न सोडवण्यावर भर

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनुसार प्रत्येक भागातील पक्ष संघटनेला वेळ देतोय. इथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय. त्यात आरोग्य विभागाशी संबंधीत प्रश्न सोडवण्यावर भर देण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. 

संभाजीराजेंबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील
छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. आम्ही सर्वच शाह, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचे आहोत. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत आदर आहे. ते पूर्वश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यांचे पवार साहेब यांच्याशी प्रेमाचे संबंध आहेत. त्यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं राजेश टोपे यावेळी म्हणाले. 

अनिल देशमुखांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मतदार संघातील विकास थांबायला नको
पुढे टोपे म्हणाले,  अनिल देशमुख यांच्या काटोल मतदार संघात विकास व्हायला हवा, सलील देशमुख जबाबदारीने काम करत आहेत. सलील देशमुख यांना सर्व मंत्री सहकार्य करत आहेत. अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीत काटोल मतदार संघातील विकास थांबायला नको. काटोल मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात यावा

निधीवाटपाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले..
शिवसेना आमदार आशिष जैसवाल हाडाचा कार्यकर्ता आहे. मेहनती आहे. त्यांच्या मतदारसंघाचा विकास व्हायलाच हवा. ही महाविकास आघाडीची जबाबदारी आहे. आम्ही सर्व मिळून आशिष जैसवाल यांच्या मतदारसंघाचा विकास करुन दाखवू. असं टोपे म्हणाले. 

 

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सत्तेची चावी महायुती की महाविकास आघाडीकडे? पवार काका पुतण्या अन् शिंदे ठाकरेंमध्ये 'या' 158 मतदारसंघात थेट लढत!
सत्तेची चावी महायुती की महाविकास आघाडीकडे? पवार काका पुतण्या अन् शिंदे ठाकरेंमध्ये 'या' 158 मतदारसंघात थेट लढत!
Kolhapur Crime : निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
Sada Sarvankar Vs Amit Thackeray: राज ठाकरे म्हणाले मी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, सदा सरवणकरांचं प्रत्युत्तर
राज ठाकरे म्हणाले मी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, सदा सरवणकरांचं प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : इस्लामी राष्ट्रात जाऊन मोदी मुस्लीम टोपी घालतात -संजय राऊतSmita Thorat On Rohit Patil  : रोहित पाटलांच्या प्रचारात बहीण स्मिता थोरातही सहभागीABP Majha  Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 11 NOV 2024Amit Shah : सांगलीतल्या सभेत अमित शाहांचं सूचक वक्तव्य, 2 दिवसांत शाहांना सूर का बदलावे लागले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सत्तेची चावी महायुती की महाविकास आघाडीकडे? पवार काका पुतण्या अन् शिंदे ठाकरेंमध्ये 'या' 158 मतदारसंघात थेट लढत!
सत्तेची चावी महायुती की महाविकास आघाडीकडे? पवार काका पुतण्या अन् शिंदे ठाकरेंमध्ये 'या' 158 मतदारसंघात थेट लढत!
Kolhapur Crime : निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
Sada Sarvankar Vs Amit Thackeray: राज ठाकरे म्हणाले मी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, सदा सरवणकरांचं प्रत्युत्तर
राज ठाकरे म्हणाले मी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, सदा सरवणकरांचं प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Weekly Horoscope : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Maharashtra Assembly Election 2024:नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय  प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 अवयव
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
Embed widget