एक्स्प्लोर

Eknath Shinde : आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही, एकनाथ शिंदे म्हणाले...

Eknath Shinde On Shivsena : शिवसेना सोडली नाही आणि सोडणार नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केल्यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Eknath Shinde On Shivsena : राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापत असल्याचं चित्र असून वेगवान घडामोडी घडत आहेत. सोमवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटली. त्यामुळे सेनेत फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली. आणि याच परिस्थितीत सेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडाचं हत्यार उपसलं. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना केवळ 35 आमदारांचाच नाही, तर 40 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत ते काल म्हणाले, भाजपसोबत जावं हीच पक्ष हिताची भूमिका आहे. मला तुमच्याकडून आश्वासन हवं आहे. मला मंत्रिपद नाही  दिलं तरी चालेल. पण भाजपसोबत सरकार बनवा. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणार नाही असं वक्तव्य केल्यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही - एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेच्या माझ्यासोबतच्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे त्यांनी हिंदुत्वाची जी शिकवण दिली त्यावर आम्ही पुढे जात आहोत. सत्तेसाठी असो किंवा मग राजकारणासाठी असो हिंदुत्वाचे बाळासाहेबांचा आहे ते कडवट हिंदुत्व ही भूमिका ही भूमिका आम्ही सर्व जण पुढे घेऊन जातोय. आम्ही सगळे बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही,आम्ही शिवसेना सोडणार नाही. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढचे राजकारण समाजकारण करणार आहोत. बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिला आहे. त्यामध्ये कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही आणि हाच विचार पुढे घेऊन जातोय.

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे फोनवरुन चर्चा

मिलिंद नार्वेकर आणि संदीप फाटक यांची एकनाथ शिंदे यांची भेट झाली. उभय नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी महाविकास आघाडीमध्ये राहू नये, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,  तुमचं काही नाही,माझं काही नाही तर जायचं कशाला? उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पुन्हा एकदा शिवसेना आमदारांची आणि नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार - खासदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदेशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला असला तरी त्यावर तुर्तस कोणतीही चर्चा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह स्थापन केलेली महाविकास आघाडी  कायम राहणार असल्याचे सूतोवाच उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केले आहे. 

शिवसैनिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया, महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य धोक्यात?

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसैनिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. मुंबईत शिवसेना भवनाबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक एकत्र आले होते. शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडखोरीविरोधात महिला शिवसैनिकांचा आक्रोशही पाहायला मिळाला. त्यावेळी एका महिला शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य धोक्यात आल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या एका गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याचं पटलं नसल्याचंही स्पष्ट होतंय. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या धरतीवर शिवसेनेला काँग्रेसची सोबत परवडणार नसल्याचं अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असल्याची माहिती आहे.

भाजपा बहुमताचा 145 चा आकडा गाठू शकते.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतांची जुळवाजुळव केली ती पाहता एकनाथ शिंदे यांच्या दाव्यानुसार जर  40 शिवसेना आमदार  असतील तर सत्तेची गणित बसवणं भाजपासाठी कठीण जाणार नाही असं चित्र दिसत आहे. भाजपाचे  106 आमदार, एकनाथ शिंदेंना समर्थन करणारे 40 आणि अपक्ष अशी मोट बांधून भाजपा बहुमताचा 145 चा आकडा गाठू शकते.

Eknath Shinde : 35 नव्हे तर 40 शिवसेना आमदार माझ्यासोबत, एकनाथ शिंदेंची एबीपी माझाला माहिती

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गुजरातमध्ये....राजकीय भूकंप महाराष्ट्रात; शिंदेंचे बंड, शिवसेनेची बैठक...काय घडलं दिवसभरात?

Eknath shinde : मला मंत्री केलं नाही तरी चालेल पण भाजपसोबत सत्ता स्थापन करा... एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

Devendra Fadanvis : ते पुन्हा येणार?... या पाच कारणांमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget