एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : "...तर संजय राऊतांना मी भेटणार" राजकारणातल्या कटुतेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis On Maharashtra Politics : राजकीय कटुता संपवण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत केल्यानंतर फडणवीस म्हणतात, '..तर मी संजय राऊतांना भेटणार'

Devendra Fadnavis On Maharashtra Politics : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे 103 दिवसांनी जेलबाहेर आले आहेत. यानंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत, राजकीय कटुता संपवण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भूमिकेचं राऊतांकडून स्वागत करण्यात आलं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत आपलं मत व्यक्त केलंय. पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीसांनी राजकीय कटुता, अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम, वन नेशन-वन  इलेक्शन या महत्वपूर्ण विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले फडणवीस?

...तर संजय राऊतांना भेटणार- देवेंद्र फडणवीस
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत म्हटले, राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत, मी सर्वांची भेट घेणार आहे. दोन तीन दिवसात देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्र्यांना भेटणार. महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत, त्यामुळे त्यांना भेटणार, असं राऊत म्हणाले. तसेच राजकीय कटुता संपवण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेचं संजय राऊतांकडून स्वागत करण्यात आलं. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, संजय राऊतांनी भेट मागितली तर त्यांना नक्की भेटणार, राजकारणातील कटूता दूर करण्यासाठी सर्वांना मिळून ठरवावं लागेल, कुठलाही एक पक्ष हे ठरवू शकत नाही, आणि नेत्यांनी शांत राहायचं, इतरांना बोलायला लावायचं ही पद्धत बंद करायला हवी असे सांगितले. 

'वन नेशन, वन  इलेक्शन' वर देवेंद्र फडणवीस म्हणाले...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकासंदर्भात मुख्य निवडणूक (Chief Election Commissioner) आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar)  मोठे वक्तव्य केले.  'वन नेशन, वन  इलेक्शन' (One Nation One Election) साठी निवडणुकीसाठी निवडणूक आयोग तयार आहे. यावर फडणवीस म्हणाले, संपूर्ण देशात वन नेशन, वन इलेक्शन असे झालेच पाहिजे. देशात जेव्हा प्रत्येक राज्याची निवडणूक होते, या ऐवजी सगळ्या निवडणुका एकत्रित झाल्या, तर त्या राज्याचा खर्चही वाचेल, मतदारांना देखील सोयीचे पडेल. राजकीय पक्षांना देखील एक भूमिका घेऊन समोर जावे लागेल

शिवप्रेमींसाठी आज समाधानाची बाब
 प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली असून महसूल विभाग, वन विभागाकडून हे पाडकाम करण्यात येत आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या संदर्भातील कारवाई यापूर्वीही सुरू केली होती, पण पुन्हा त्यात काही कायदेशीर अडचणी आल्या होत्या. मात्र आता हे अतिक्रमण काढण्यात येत आहे. शिवप्रेमींची सातत्याने मागणी होती, आज त्यांच्यासाठी समाधानाची बाब आहे. 

संबंधित बातम्या

Sanjay Raut: संजय राऊत 'मातोश्री'वर; शंखनाद, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, तर आदित्य ठाकरेंकडून कडकडून मिठी मारुन स्वागत

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget