एक्स्प्लोर
Dadar Kabutar Khana: दादर कबुतरखान्याबाहेर पोलिसांची तगडी फिल्डिंग, मराठी एकीकरण समितीला नोटीसा, आता काय घडणार?
Dadar Kabutar Khana: दादर कबुतरखान्याबाहेर मराठी एकीकरण समितीकडून आंदोलनाची हाक, जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद करुन घेतला आहे. तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Dadar Kabutar Khana
1/9

कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज (13 ऑगस्ट) मराठी एकीकरण समितीच्यावतीनं आंदोलन करण्यात येणार आहे. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्यावतीनं उत्तर देण्यात येणार आहे.
2/9

काल रात्रीच मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत.
3/9

मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख दादर कबुतरखाना येथील आंदोलनासाठी रवाना झाले आहेत. त्यांनी आपण पोलिसांना निवेदन देणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
4/9

या पार्श्वभूमीवर दादरच्या कबुतरखान्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद ठेवण्यात आला आहे.
5/9

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबुतर खाना परिसरातील दुकान दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांकडून आदेश देण्यात आले आहेत. तसेच जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
6/9

कबूतरखाना येथे मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 150 मुंबई पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाजी पार्क, दादर, शाहू नगर, धारावी, व्हि बी नगर, माहिम, कुर्ला पोलिस ठाण्यातील पोलीस बंदोबस्ताला आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाच्या पोलिसाचीही वाढीव कुमक या ठिकाणी बोलवण्यात आली आहे. कबूतरखाना परिसराला आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर छावणीचे स्वरुप पाहायला मिळत आहे.
7/9

कबुतरखाना बंदीप्रकरणी आज मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. महाधिवक्त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. कबुतरखान्यांमुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने तज्ज्ञ समिती नेमण्याबाबतही कोर्टाच्या सूचना आहेत. या तज्ज्ञ समितीचीही आज कोर्टात घोषणा होण्याची शक्यता आहे.
8/9

6 ऑगस्ट रोजी जैन आणि मारवाडी समाजाने पोलिसांनी धक्काबुक्की केली. सार्वत्रिक मालमत्तेच नुकसान केलं आहे. हजारो जण रस्त्यावर उतरले होते.
9/9

स्थानिक नागरिकांनी कबुतरखान्यासमोरच्या जैन मंदिराशेजारी असणाऱ्या एका इमारतीच्या छतावर अनधिकृतपणे नव्याने कबुतरखाना सुरु केला आहे.
Published at : 13 Aug 2025 09:31 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























