Cloud burst in Jammu: जम्मूच्या किश्तवाड़मध्ये आभाळ फाटलं, 30 जणांचा मृत्यू, नेमकी परिस्थिती काय ?
केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी परिस्थितीचा आढावा घेत बचाव पथक घटनास्थळी रवाना केले आहे

Jammu: जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड़ जिल्ह्यातील परेड ताशोती भागात ढगफुटी झाल्याची बातमी समोर येत असून आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे . मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे . किश्तवारमध्ये चाशोटी भागात ढगफुटीमुळे अचानक पुर आला . या पुरात लंगर शेड (सामुदायिक स्वयंपाकघर ) वाहून गेलाय .दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी परिस्थितीचा आढावा घेत बचाव पथक घटनास्थळी रवाना केले आहे . एकूण नुकसानाचे मूल्यांकन आणि आवश्यक बचाव आणि वैद्यकीय व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यात येत आहे . पूर आलेल्या भागातून माचैल माता यात्रेची सुरुवात होते. या परिसरात अनेक भाविक असून लहान मुले व वयस्क भाविकांचाही समावेश आहे
प्रशासनाने तातडीने बचाव कार्य केले सुरू
किश्तवारचे उपयुक्त पंकज शर्मा म्हणाले किश्तवाड़च्या भागात अचानक पूर आला .या भागातून माचैल माता यात्रेची सुरुवात होते . दरम्यान या भागातही बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे . जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत .जखमींना लवकर बरे होण्यासाठी ही प्रार्थना केली आहे .तसेच नागरी पोलीस ,सैन्य, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्यासाठी पूर बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
Two National Disaster Response Force (NDRF) teams have been rushed to Jammu and Kashmir’s Kishtwar district after a massive cloudburst struck in the region: NDRF
— ANI (@ANI) August 14, 2025
हवामान विभागाचा इशारा काय ?
श्रीनगर हवामान केंद्राने पुढील चार ते सहा तासांसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस तसेच मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवली आहे.कुपवाडा बारामुल्ला, बांदीपोरा, श्रीनगर, गंधर्बल, बडगाम, पुंछ, राजौरी ,रियासी ,उदमपूर ,डोळा, कष्टवादाचा डोंगराळ भाग तसेच काझीगुंड बनिहाल रामबन पक्षावर काही ठिकाणी अल्पकालावधीसाठी मुसळधार पाऊस पडू शकतो .
याशिवाय काही संवेदनशील ठिकाणी आणि डोंगराळ भागात ढगफुटी अचानक पूर तसेच भूस्खलन व दरड कोसळण्याची शक्यता आहे.त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना विजेचे खांब, तारा आणि जुन्या झाडांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
ढगफुटी म्हणजे काय ?
ढगफुटी म्हणजे कमी कालावधीत बहुतेकदा लहान भौगोलिक क्षेत्रात होणारी अतिवृष्टी .सामान्यतः डोंगराळ प्रदेशात होणाऱ्या ढगफुटीमुळे अचानक पूर आणि भूस्खलन होऊ शकते . ढगफुटी मध्ये एका तासात 100 मीमी (4 inch) किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो . ढगफुटी जेव्हा होते तेव्हा उबदार ओलसर हवा पर्वतांमधून वेगाने वर येते थंड होते आणि मुसळधार पावसात त्याचं रूपांतर होते .ही प्रक्रिया ज्याला ऑरो ग्राफिक लिफ्ट असे म्हणतात .यामुळे थोड्याच वेळात प्रचंड पाऊस पडतो .उष्ण आणि थंड हवा वरच्या दिशेने जाते .उंचावर आद्रता जास्त असल्याने ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होते .
उत्तर भारतात पावसाचं पुन्हा धुमशान; आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आभाळं फाटलं, मोठ्या जिवितहानीची भीती























