Shashi Tharoor : आपल्या उमेदवारीने देशाला सक्षम विरोधी पक्ष मिळेल, काँग्रेसचे अध्यक्ष पदाचे उमेदवार शशी थरूर यांचा विश्वास
Shashi Tharoor : शशी थरूर पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या वर्तमान परिस्थितीवर वाईट बोलणार नाही. मात्र पक्षात बदल आणू इच्छितो
Shashi Tharoor : आपल्या उमेदवारीने देशाला सक्षम विरोधी पक्ष मिळेल, असा विश्वास कॉंग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे उमेदवार शशी थरूर यांनी व्यक्त केला. शशी थरूर (Shashi Tharoor) काल वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी ऐतिहासिक अशा सेवाग्राम आश्रमाला त्यांनी भेट देत पाहणी केली आणि महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण केल्यानंतर वर्धा शहरातील चिंतामणी कॉलेजच्या सभागृहात पत्रकार परिषद घेतली, यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
पक्षात बदल आणू..
शशी थरूर पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या वर्तमान परिस्थितीवर वाईट बोलणार नाही. मात्र पक्षात बदल आणू इच्छितो असे ते म्हणाले. एकीकडे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दुसरीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा या दोन्हीची देशात चर्चा आहे. यामुळे पक्ष जागृत होत असून देशात चांगला संदेश जात आहे. आमचा पक्ष मी नाही तर आम्ही वाला आहे. असं म्हणाले.
अध्यक्ष पदाची निवडणूक पक्षासाठी आवश्यक
मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे समर्थक उमेदवार अशी चर्चा आहे असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, या विषयी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत बोललो. त्यांनी अधिकृत उमेदवार कोणीच नाही. आम्ही निपक्ष असू असे ते म्हणाले. आपल्याला कोणाचा पाठींबा आहे? असे विचारले असता ते मतमोजणी नंतर दिसून येईल असे सांगून अध्यक्ष पदाची निवडणूक पक्षासाठी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ
स्वातंत्र्याची चळवळ ज्या पवित्र ठिकाणावरून झाली त्या सेवाग्राम येथून आपण आपल्या काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ करतो आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांनी सेवाग्राम येथे बापूकुटीत महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर वर्धा शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे युवा नेते आशिष देशमुख, माजी प्रदेश सचिव प्रवीण हिवरे, माजी शहर अध्यक्ष राजेंद्र शर्मा, इक्रम हुसेन आदींची उपस्थिती होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Shashi Tharoor : अध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे आमच्या सहकाऱ्यांमध्ये होत असलेली प्रक्रिया, युद्ध नाही : शशी थरूर
मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक; राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा