एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : सरकार पाडण्याच्या कारस्थानात राज्यपालही सहभागी, माकपचा आरोप; ठाकरे सरकारला पाठिंबा

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्ता पालटाच्या कटात राज्यपाल कोश्यारी सहभागी असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. बहुमत चाचणीत पक्षाने ठाकरे सरकारला पाठिंबा दिला आहे.

Maharashtra Political Crisis : भ्रष्ट मार्गाने जमा केलेला प्रचंड पैसा आणि केंद्रीय तपासयंत्रणा यांचा गैरवापर करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उलथून टाकण्याचे भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आता उघड झाले आहे. या कारस्थानात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सामिल असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. बहुमत चाचणीत पक्षाचे आमदार विनोद निकाले ठाकरे सरकारला पाठिंबा देणार आहेत. 

राज्यपालांनी तातडीने 30 जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा महाविकास आघाडीला आदेश दिला आहे. विधान परिषदेच्या १२ आमदारांची आणि नियमित विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात राज्यपाल दीर्घकाळ आडवे आले आहेत. आता हा बहुमत चाचणी करण्याचा आदेश हा संविधानाची हत्या करणारा असल्याचे माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी म्हटले आहे.

संविधानातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संघराज्य प्रणालीचे रक्षण करण्यासाठी, महाराष्ट्राचा सन्मान राखण्यासाठी केंद्रातील भाजपच्या फॅसिस्ट व धर्मांध एकाधिकारशाहीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेहमीच कसून विरोध करत आला आहे आणि यापुढेही करत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेला सामोरे जाईल तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. विनोद निकोले वरील मूल्यांचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे राहून तिच्या सरकारच्या समर्थनार्थ मतदान करतील असेही डॉ. नारकर यांनी स्पष्ट केले. 

मंगळवारी रात्री भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
Faf Du Plessis : मी पुन्हा येईन म्हणत फाफ डु प्लेसिसची 2026 च्या IPL ऑक्शन मधून बाहेर पडत असल्याची घोषणा, पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार
मी पुन्हा येईन म्हणत फाफ डु प्लेसिसची 2026 च्या IPL ऑक्शन मधून बाहेर पडत असल्याची घोषणा, PSL मध्ये खेळणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : ठाकरेंचे वारे मतभेदाचे, एकनाथ शिंदे-बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली
BJP Vs Sena Special Report : राजकारण तळाला पाठिंबा भावाला, रवींद्र चव्हाणांमुळे राजकारण तापलं
Nitesh Rane Special Report : राजकीय गेम अन् भावाचं प्रेम, भावासाठी भाऊ राजकीय मैदानात
Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
Faf Du Plessis : मी पुन्हा येईन म्हणत फाफ डु प्लेसिसची 2026 च्या IPL ऑक्शन मधून बाहेर पडत असल्याची घोषणा, पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार
मी पुन्हा येईन म्हणत फाफ डु प्लेसिसची 2026 च्या IPL ऑक्शन मधून बाहेर पडत असल्याची घोषणा, PSL मध्ये खेळणार
राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंनी घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; शिवसेनेच्या ऑफरबाबतही स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंनी घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; शिवसेनेच्या ऑफरबाबतही स्पष्टच सांगितलं
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सनसनाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सनसनाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
Embed widget