गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल, जीवाला धोका असल्याचा महिलेचा आरोप
गणेश नाईक यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या पीडित महिलेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मला आणि माझ्या मुलाला न्याय मिळेपर्यंत सर्वांनी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
![गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल, जीवाला धोका असल्याचा महिलेचा आरोप Maharashtra News Video of woman accusing Ganesh Naik goes viral on social media गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल, जीवाला धोका असल्याचा महिलेचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/21/88c1c9acd7f229c6f2654ffb7025ad0e_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
BJP MLA Ganesh Naik : भाजप नेते आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, गणेश नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून जर नाईकांना अटकपूर्व जामीन भेटला. तर माझ्याह मुलाच्या जीवाला धोका असल्याचं वक्तव्य पीडित महिलेने केलं आहे. गणेश नाईक यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या पीडित महिलेचा आपल्या जीवाला धोका असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पीडित महिला आपल्या व्हायरल व्हिडीओमध्ये म्हणाल्या, माझ्यासह मुलाच्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाचे कधीही बरे वाईट होऊ शकते. माझ्या अपहरणाची किंवा कधीही माझ्या हत्येचा कट रचण्याची शक्यता आहे. मला सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती मी करत आहे. मला सरकारकडून जे सहकार्य मिळाले त्यासाठी मी सरकारची आभारी आहे. मला आणि माझ्या मुलाला न्याय मिळेपर्यंत सर्वांनी मला असेच सहकार्य करा.
सध्या गणेश नाईक अडचणीत सापडले असून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दीपा चौहान यांनी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना दीपा चौहान म्हणाल्या की, गणेश नाईक यांच्या बरोबर आपले गेल्या 27 वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये आहे. या प्रेमसंबंधातून 15 वर्षाचा मुलगा झाला असून त्याला गणेश नाईक यांनी वडीलांचे नाव द्यावे, अशी मागणी दीपा चौहान यांनी केली आहे.
गणेश नाईक यासाठी नकार देत असल्याने थेट पोलीस ठाणे गाठत दीपा चौहान यांनी गणेश नाईकांवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी दीपा चौहान यांनी महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली असून वेळ पडल्यास कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून आपली गणेश नाईक यांच्या बरोबर भेट झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मुलाबरोबर सुरू असलेले बोलणे ही गणेश नाईक यांनी बंद केल्याचेही दीपा चौहान यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)