एक्स्प्लोर

TET परीक्षेच्या घोटाळ्याची व्याप्ती वाढली, सायबर पोलिसांच्या तपासात 1778 विद्यार्थ्यांचं बिंग फुटले

TET Exam : टीईटीच्या 2018 च्या परीक्षेतही 1778 जण अपात्र असतानाही पात्र ठरल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे

TET Exam : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीच्या 2019- 20 च्या परीक्षेत तब्बल 7 हजार 800 बोगस अपात्र उमेदवार  सापडले. आता 2018 च्या परीक्षेतही 1778 जण अपात्र असतानाही पात्र ठरल्याचे पोलीस चौकशीतून पुढे आले आह. त्यामुळे एकूणच वाढत जाणारा हा आकडा पाहता टीईटी घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढत चालली आहे. 

पुणे सायबर पोलिसांनी आतापर्यंत 2019-20 च्या टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार पुढे आणला होता. उमेदवारांकडून पैसे घेऊन परीक्षेच्या निकालामध्ये फेरफार करून काही जण अपात्र असतानाही त्यांना पात्र केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली होती. त्यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जी.ए.टेक्‍नॉलॉजी कंपनीचे अधिकारी, दलालांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. टीईटीच्या 2019- 20च्या परीक्षेत तब्बल 7 हजार 800 बोगस अपात्र उमेदवार आढळले. यानंतर 2018च्या परीक्षेतही असाच गैरप्रकार झाल्याचा संशय पोलिसांना असल्याने त्या दृष्टीने तपास सुरु केला. त्यानंतर 2018 च्या परीक्षेतही 1778 जण अपात्र असतानाही पात्र ठरल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

दरम्यान, 2018 मध्येही याच प्रकारे गैरप्रकार झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्यामध्येही गुन्हा दाखल करुन आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये आणखी 12 आरोपी निष्पन्न झाले असून पोलिसांकडून त्यांचा तपास सुरु आहे. टीईटीच्या 12 सप्टेंबर 2018 मध्ये झालेल्या परीक्षेच्या मूळ निकालामध्ये 817 जणांचे गुण वाढवण्यात आल्याचे उघड झाले. त्या सर्वांची उत्तरपत्रिका उत्तरसुचीप्रमाणे पडताळणी करण्यात आली. त्यासंबंधीचा मूळ निकाल त्याच दिवशी ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर संबंधित निकालामध्ये अपात्र असलेले आणखी 710 आणि 38 उमेदवारांचे गुण वाढवून त्यांची माहिती नंतर दोनदा संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट झाले. त्यानुसार, आत्तापर्यंत 1778 अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचे आढळून आले आहे. 

 या आरोपींकडून आतापर्यंत जवळपास साडेतीन कोटी रुपये रोकड, जवळपास एक कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने,  काही अलिशान गाड्या देखील जप्त करण्यात आले आहेत.या सगळ्या मुद्दे मालाची रक्कम जवळपास साडेसहा कोटी इतकी आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
Santosh Deshmukh case: CID समोर सर्वात मोठं चॅलेंज, सुदर्शन घुले देशाबाहेर पळाल्याची शक्यता, संतोष देशमुखांचा मारेकरी कसा सापडणार?
CID समोर सर्वात मोठं चॅलेंज, सुदर्शन घुले देशाबाहेर पळाल्याची शक्यता, संतोष देशमुखांचा मारेकरी कसा सापडणार?
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Beed Police Station : बीड पोलीस स्टेशनमध्ये अचानक पाच नवे पलंग का मागवले?Maharashtra Cabinet Meeting : शंभर दिवसांचा रोड मॅप, खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठकTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
Santosh Deshmukh case: CID समोर सर्वात मोठं चॅलेंज, सुदर्शन घुले देशाबाहेर पळाल्याची शक्यता, संतोष देशमुखांचा मारेकरी कसा सापडणार?
CID समोर सर्वात मोठं चॅलेंज, सुदर्शन घुले देशाबाहेर पळाल्याची शक्यता, संतोष देशमुखांचा मारेकरी कसा सापडणार?
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Mumbai : महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Santosh Deshmukh Case: बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता एसआयटीचे प्रमुख तपासाचा चार्ज घेणार
बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता वाल्मिक कराडच्या नार्को टेस्टची मागणी
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये  5 जणांवर गुन्हा दाखल
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल
Embed widget