Sanjay Raut : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावावर पर्यटन, अयोध्या दौऱ्यावरुन संजय राऊतांचा सरकारवर निशाणा
हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावावर पर्यटनाला गेलं असल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं.
Sanjay Raut : अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं (Agriculture Crop) मोठं नुकसान झालं आहे. अशातच हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावावर पर्यटनाला गेलं असल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं. हे ढोंग असून, त्यांना श्री रामाचा आशिर्वाद लाभणार नसल्याचे राऊत म्हणाले. अधिवेशन संपताच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ म्हणाले होते. मात्र, शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचे म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर जोरदार टीका केली.
तुम्हाला रामाची आठवण आता झाली का?
गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते अयोध्येला गेल्याचे मला दिसले नाही. आम्ही सातत्यानं जात आहोत. तेथील मंदिरासाठीआम्ही संघर्ष केल्याचे राऊत म्हणाले. अयोध्येत जाणं हा एक आनंद असतो. पण रामाचं जे सत्य वचन आहे ते तुम्ही कोठून घेणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तुम्हाला रामाची आठवण आता झाली. जेव्हा तुम्ही पक्ष सोडला तेव्हा तुम्ही सुरत आणि गुवाहाटीला गेलात. तेव्हा तुम्हाला रामाची आठवण जाली नाही का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तेव्हा जर तुम्ही अयोध्येला गेले असते तर प्रभु श्रीरामानं असत्याच्या बाजूनं कौल दिला नसता असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार हे अयोध्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.
शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान
गेल्या 72 तासात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सर्वत्र शेतकऱ्यांचा हाहाकार उडाला असल्याचं संजय राऊत म्हणाले. अधिवेशन संपताच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ आणि काही भूमिका घेऊ असं सरकारनं सांगितलं होतं असे राऊत म्हणाले. पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला निघाल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्राचे प्रश्न वाऱ्यावर सोडून तुम्ही गेला आहात.
अयोध्या हे धार्मिक स्थळ आहे. लोक जातात, येतात. आम्हीच त्यांना अयोध्येचा रस्ता दाखवल्याचे संजय राऊत म्हणाले. आम्ही ज्यावेळी अयोध्येला जाऊ त्यावेळी तेथील जनता आमच्या पाठीशी कशी उभी आहे ते पाहू असेही संजय राऊत म्हणाले. अयोध्येची जाा ही राजकारण करण्याची नसल्याचे राऊत म्हणाले.
गौतम अदानी प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं
या देशात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची डीग्री खोटी आहे हे समोर आणलं आहे. हे चित्र काही चांगल नसल्याचे संजय राऊत म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादावर मला काही बोलायचे नाही. पण गौतम अदानी प्रकरणावर जे प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्या प्रश्नाची चौकशी होणं गरजेचं आहे. सत्य समोर येणं गरजेचं असल्याची विरोधकांची मागणी असल्याचे संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: