Navneet Rana : उद्धव ठाकरेंची सभा झालेल्या बीकेसी मैदानावर हनुमान चालिसा वाचू, राणा दाम्पत्याचं शिवसेनेला पुन्हा ओपन चॅलेंज
Navneet Rana on Uddhav Thackeray : सध्या सोनिया गांधींचं निवासस्थान म्हणजेच 10 जनपथ हीच शिवसेनेची मातोश्री झालीय अशा शब्दात राणांनी टोला हाणला आहे.
मुंबई : राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केलाय. काल उद्धव ठाकरेंनी ज्या बीकेसी मैदानात सभा घेतली त्या मैदानात हनुमान चालिसा वाचून शुद्धीकरण करणार असं नवनीत राणा म्हणाल्या दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणा दाम्पत्यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आङे. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही औरंजेबसेना झालीय अशा शब्दात राणांनी टीकास्त्र डागलंय.
सध्या सोनिया गांधींचं निवासस्थान म्हणजेच 10 जनपथ हीच शिवसेनेची मातोश्री झालीय अशा शब्दात राणांनी टोला हाणला आहे. कालच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर देखील टीका केली होती. राज ठाकरेंच्या वतीनं देखील राणांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.
नवनीत राणा यांनी पुढे म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांची कालची सभा लाचार होती. त्यांनी त्यांच्याच वक्तव्यावरून पलटी घेतली. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत काहीही बोलले नाहीत. रोजगाराबाबत कोणतीही घोषणा केली नाही.' हनुमान चालीसा पठण करणारे सध्या गायब झाले आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करावी, असं मुख्यमंत्र्याची मुंबईतील भाषणात बोलल्याचं सांगत नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला.
मुख्यमंत्री हनुमान चालीसेचा विरोध करतात, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्याची लाचारी स्पष्ट दिसतेय. गदा हाती न घेता मुख्यमंत्र्यीनी हनुमानाचा अपमान केला आहे, असंही नवनीत राणा यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या