Suhas Kande : नाशिकच्या शिंदे गटाचा बॉस कोण? हेच मला माहिती नाही, सुहास कांदेची नाराजी उघड
Suhas Kande : नाशिकच्या शिंदे गटाचा बॉस कोण हेच मला माहिती नाही, असा आश्चर्यकारक सवाल सुहास कांदे यांनी उपस्थित केला.
Suhas Kande : नाशिकमध्ये (Nashik) शिंदे गटाचे कार्यालय आहे , हे मला माहिती नाही. शिवाय कार्यालय उघडलंय हेच मला माहिती नाही, त्यावर भाष्य करणार नाही, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) नाशिकमध्ये भेट दिली, मात्र नांदगाव मतदारसंघात (Nandgaon) मोठ्या महंतांचे निधन झाल्याने येऊ शकलो नाही, याबाबत आमचे बोलणे झाले होते, अशी माहिती सुहास कांदेने (Suhas Kande) दिली. शिवाय जिल्ह्याच्या पक्ष प्रमुख कोणीतरी असतो, नाशिकच्या शिंदे गटाचा बॉस कोण हेच मला माहिती नाही, असा आश्चर्यकारक सवालही सुहास कांदे यांनी उपस्थित केला.
गेल्या महिना दीड महिन्यापासून सुहास कांदे हे नाशिकमध्ये झालेल्या शिंदे गटाचं कार्यक्रमांना तसेच पालकमंत्री भुसे यांच्या बैठकांना दिसून आले नाही. त्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गटात आलबेल नसल्याची चर्चा रंगू लागली. अशातच सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेत नाराज नाही, मात्र बैठकांना टाळले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर शिंदे गटाबाबतच्या नाशिक जिल्ह्याच्या अनेक तक्रारी त्यांनी यावेळी केल्या. ते म्हणाले, शिंदे गटाचे कार्यालय उघडलंय हेच मला माहिती नाही, मुख्यमंत्री येणार आहेत, हे माहिती होत, मात्र नांदगाव मतदारसंघात जवळच्या महंतांचे निधन झाल्याने येऊ शकलो नाही,. याबाबत मुख्यमंत्र्यांना कळविले, यायला जमणार नाही असे सांगितले, त्यांनीही होकार दिला. त्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाचे कार्यालय आहे का? हे आता माहिती पडतंय, असा आश्चर्यकारक विधान त्यांनी यावेळी केले.
तसेच ते पुढे म्हणाले, दुर्दैवाने बैठकीची माहिती मिळत नाही, म्हणूनच बैठकीला अनुपस्थित राहतो, मला कुणाकडून माहिती मिळत नसते, शासन, जनसंपर्क आधिकारी यांच्याकडून माहिती मिळत नाही. पीआरओ कडून माहिती दिली जात नसेल, दादा भुसेंचा आदर करतो, मी तक्रार करत नाही. भुसेंचे नेतृत्व मान्य आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. त्यामुळे ही तक्रार नाही, मात्र वेगळं का ठेवलं जातंय, महत्वाच्या बैठकांना का बोलवलं जात नाही. हे भुसेंना विचारा, असे उलट सवाल कांदे यांनी माध्यमांना केला. माझावर अन्याय झालेला नाही, किंवा मला टाळले जात नाही, माझावर अन्याय झाला असता तर मला निधी मिळाला नसता, पण तसे होत नाही. जवळपास २ हजार कोटी रुपये मिळाले आहेत, आठशे कोटींची कामे झाली आहेत.. त्यामुळे मी नाराज नाही. मात्र मला बैठकांना का बोलावले जात नाही, हा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री नाही तर एकनाथ संभाजी शिंदे या माणसावर वैयक्तिक प्रेमामुळे पक्षात आहे. यासाठी मानापमान सहन करावे लागतील तरी चालेल. शिंदे साहेबांसोबत सदैव, मरेपर्यंत सोबत आहोत, पद येताच जातात. तिकीट भेटलं नाही तरी चालेल तरी शिंदे साहेबांसोबत असणार आहे. शिंदे साहेब कधीही अन्याय करणार नाही, अन्याय झाला तरी शिंदेसाहेबांसोबत राहून काम करेल. शिवाय मंत्री पदही नको, याबाबत मुख्यमंत्र्यांना यापूर्वीच सांगितलं होत, विशेष म्हणजे भुसेंना मंत्री पद द्यावं, पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळविल्याचे सुहास कांदे यांनी संगितले.
नाशिकमधून शिंदे गटात येण्याचं इनकमिंग सर्वात कमी
तसेच नाशिक जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची निवड चुकीची असून यातील एकही पदाधिकारी शिंदे गटाला साजेशा नाही. याबाबत तक्रार मुख्यमंत्र्याकडे केली आहे.. त्याच्याशी चर्चा झाली आहे. आतापर्यंत एकही मोठा नेता पक्षात आला नाही. त्यामुळे पक्ष मोठा होता नाही. चांगल्या लोकांना आपल्यात घेणं महत्वाचं, सगळ्या निवडी चुकीच्या असून पक्षाच्या नेतृत्व मान्य करत ज्या निवडी चुकीच्या असतील, त्यावर विचार करून बदल करू असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर अवघ्या काही दिवसांत नांदगाव मतदारसंघात कामे आली. निधी मिळाला. जवळपास तीन वर्षांपासून कामे अटकली होती. आता प्रशासकीय मान्यतेसह निधी मिळाला असून लवकरच या कामांचे उदघाटन होणार असल्याचे ते म्हणाले.