Nashik Rain Update : गतवर्षी जुलैत गोदावरीला पूर, यंदा मात्र खडखडाट; ढगाळ वातावरण, मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा
Nashik Rain : गेल्या आठवड्याभरापासून नाशिकसह जिल्ह्यात जोरदार पावसाची (Heavy Rain) प्रतीक्षा अद्यापही कायम आहे.
Nashik Rain Update : गेल्या आठवड्याभरापासून नाशिकसह जिल्ह्यात जोरदार पावसाची (Heavy Rain) प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस पडत असला तरी नागरिकांसह शेतकऱ्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र आजही जोरदार पावसाने नाशिकला हुलकावणी दिली आहे. त्यामुळे अर्धा जुलै संपत आला तरीही अद्याप दमदार पावसाने (Nashik Rain) हजेरी नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने (Rain) दमदार हजेरी लावल्यानंतर अल्पावधीतच पावसाने उघडीप दिली त्यानंतर शेती कामांना वेग आला होता. मात्र आता भात लागवड (Crop Sowing) करण्याची वेळ आली असताना पावसाने ओढ दिल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे अर्धा जुलै संपत आला तरी अद्यापही भात लावणी सुरू झाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. आज तरी नाशिकसह जिल्ह्यात पाऊस पडेल, अशी आशा नाशिककरांना होती. मात्र आजही रिमझिम पावसाचं ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील घाटमाता सोडता उर्वरित भागात जनतेने पाऊस पडला आहे. गेल्या आठ दिवसांपासून आकाश ढगाळ दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. याच काळात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत तर काही ठिकाणी तुरळ पावसाने हजेरी लावली. अशा परिस्थितीत नाशिकसह जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता असून जुलै महिन्यात जिल्ह्यातील अनेक धरण निम्म्याहून अधिक भरलेली असतात. मात्र यंदा हे प्रमाण अत्यंत कमी आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा
सिन्नर, येवला, नांदगाव" मालेगाव, चांदवड, नाशिक व निफाड या भागांमध्ये खरीप पिकांची पेरणी सलग तीन ते चार दिवस पेरणीयोग्य 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यावर करावी असे कृषी विभागाने सुचवले आहे. मका, सूर्यफूल, बाजरी, भुईमूग, खुरासणी या पिकांच्या पेरणीस उशीर केल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होईल. दरम्यान जिल्ह्यातील इतरही भागात दमदार पावसाची प्रतीक्षा असून यामुळे भात लागवड कोळंबलेली आहे तर अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ही उभा राहिला आहे.
शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला
दरम्यान पावसाचा अंदाज लक्षात घेता भात रोपवाटिका नवीन लावलेली फळबाग व भाजीपाला पिकातून अधिकचे पाणी काढावे. तसेच पूर्वेकडील अवर्षण प्रवण व मैदानी विभागात पडणाऱ्या पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी उपाययोजना करावी कापूस तूर भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, सूर्यफूल या वेळेवर लागवड केलेल्या पिकात पावसाने उघडिप दिल्यास अंतर मशागत व तंत्र तणनियंत्रणाची कामे करावीत. पावसाचा अंदाज घेऊन पिकावर कीटकनाशकांची बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्याचबरोबर भात रोपवाटिकेत रोपांच्या वाढीसाठी नत्रखत द्यावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
इतर संबंधित बातम्या :