एक्स्प्लोर

Gangapur Dam : नाशिकमध्ये पावसाची विश्रांती! गंगापूर धरणात 32 टक्के जलसाठा, अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा 

Nashik Rain : गेल्या दोन तीन दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील पाणी साठ्याची वाढ थांबली आहे.

Nashik Gangapur Dam : गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील पाणीसाठ्याची वाढ थांबली आहे. नाशिक (Nashik) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील (Gangapur Dam) पाणीसाठा अद्याप 32 टक्के इतकाच झाला असून पावसाने अधिक विश्रांती घेतल्यास साठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी 9 जुलै रोजी धरणातील साठा 36 टक्के इतका होता, तर यंदा याच दिवशी पाण्याची पातळी चार टक्क्यांनी कमी झाल्याचे चित्र आहे.

जून महिना कोरडा गेल्याने जुलै महिन्यात पावसाची प्रतीक्षा होती. त्यानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात शहरासह धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणातील (Water storage) पाणी पातळी वाढल्याने शहरावरील पाणी कपाती संकट टळले आहे. मागील आठवड्याच्या जलसाठ्यात एका टक्क्याने वाढ झाली. मात्र मागील आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा तोंड फिरवल्याने मागील आठवड्यात मिळालेल्या दिलासा या आठवड्यात चिंतेत बदलण्याची शक्यता आहे. गंगापूर धरणात सध्या 32 टक्के इतका जलसाठा असला तरी समूहाचा साठा 23 टक्के इतका आहे मागील वर्षी समूहाचा साठा 31 टक्के इतका होता. 

दरम्यान मागील महिन्यात धरणातील पाणी साठ्याची पातळी पाहता शहरात पाणी कपात (Water Cut) केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने पाण्याची पातळी 31 टक्क्यावर पोहोचल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी कपातीची वेळ येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. नाशिककरांवर अद्यापही पाणी कपातीची संकट नसले तरी पावसाची विश्रांती चिंता वाढवणारी ठरू शकते मागील वर्षी धरण समूहाचा साठा 31 टक्के इतका होता तर यंदा समूहाचा साठा 23 टक्के इतका आहे. जिल्ह्यातील धरणांमधील परिस्थिती देखील फारशी वेगळी नाही. मागील वर्षी 31 टक्क्यांवर असलेला जलसाठा आता 27 टक्के इतकाच आहे.


नांदूरमध्यमेश्वर 82 टक्क्यांवर

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक जलसाठा सद्यस्थितीत नांदूर मधमेश्वर प्रकल्पात आहे. धरण क्षेत्र सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पातळी 82 टक्के इतकी झाली आहे. जिल्हा सर्वात आधी भरणाऱ्या आणि सर्वाधिक विसर्ग असलेले हे धरण असून या धरणातून सर्वाधिक पाणी जायकवाडीला पोहोचते तर गंगापूर धरणातील पाणी पातळी कमी होत असताना दारणा धरणात मात्र जलसाठा 42 टक्के इतका झाला आहे. दरवर्षी ओव्हरट होणारे दारणा धरणातील पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत साठा कमी असला तरी धरण क्षेत्र दमदार पाऊस सुरू असल्याने मागील वर्षीच्या साठ्याची बरोबरी येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे.

असा आहे सद्यस्थितीत जलसाठा? 

दरम्यान गंगापूर धरण समूहातील गंगापूर 32 टक्के, कश्यपी 16 टक्के, गौतमी गोदावरी 12 टक्के, करंजवण 16 टक्के, ओझरखेड 25 टक्के, दारणा 42 टक्के, भावली 46 टक्के, चनकापूर 39 टक्के, हरणबारी 43 तर गिरणा धरणात  20 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget