(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : स्नॅपचॅट वापरताय सावधान! नाशिकच्या विद्यार्थ्याने शोधला स्नॅपचॅटमध्ये बग
Nashik News : तुम्ही जर स्नॅपचॅट (Snapchat) वापरत असाल तर सावधान, यात एक बग आढळून आला आहे.
Nashik News : सोशल माध्यमांमधील स्नॅपचॅटने (Snapchat) तरुणाईला वेड लावले आहे. अनेकजण आपले फोटो स्नॅपचॅटच्या माध्यमातून शेअर करत असतात. मात्र याच स्नॅपचॅटमध्ये बग सापडला असून यामुळे वापरकर्त्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या (Nashik) विद्यार्थ्याने हा बग शोधून काढला असून स्नॅपचॅटच्या 'माय आईज ओन्ली' (My Eyes Only) या फीचर मध्ये सुरक्षित असणाऱ्या फोटो किंवा माहिती बाबतचा हा बघ असून या संदर्भातील स्नॅप चॅटचा स्वीकृती दर्शक ई-मेल या विद्यार्थ्याला मिळाला आहे.
नाशिकच्या (Nashik) भुजबळ नॉलेज सिटीतील (Bhujbal Knowledge City) डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या आयआयटी विभागामध्ये तिसऱ्या वर्षातील शिकणाऱ्या विशाल सटले (Vishal Satle) या विद्यार्थ्याने स्नॅपचॅट या सोशल मीडिया ॲप मधील बघ शोधून काढला आहे. विशाल सटले हा विद्यार्थी मेटच्या सामंजस्य कराराअंतर्गत सायबर संस्कार या सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या संस्थेमध्ये इंटरशिप करीत असून या दरम्यान स्नॅपचॅटमधील हा बघ त्याच्या निदर्शनास आला आहे. स्नॅपचॅटमध्ये 'माय आईज ओन्ली' हे फीचर उपलब्ध करून दिले असून यामध्ये सेव केलेले फोटो अन्य कोणाला किंवा सर्वांना न दिसण्याची सुविधा आहे. याला असलेल्या प्रायव्हसी सेटिंगमुळे तरुणाईत हे फीचर खूपच लोकप्रिय ठरले आहे.
सायबर संस्कार चे संचालक डॉक्टर तन्मय दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली विशालने हा बघ शोधला आहे. तरुणाईत लोकप्रिय होणाऱ्या सोशल माध्यमांची सुरक्षितता आणि खाजगी पण हा एक मोठा विषय आहे खाजगीपणा जपला जाण्याची खात्री देत ही सोशल माध्यमे अनेक फीचर्स उपलब्ध करून देत असतात. परंतु याच फीचरमध्ये विशाल सटले यांनी बग शोधला असून हॅकरला ही माहिती स्क्रीनशॉटच्या माध्यमातून आपल्याकडे ठेवता येऊ शकते हे त्यांनी शोधून काढले आहे. वापरकर्त्याला हे समजणारच नसल्यामुळे या फिचरला देण्यात आलेली प्रायव्हसी ब्रेक होत आहे. विशालने शोधलेल्या बघ मुळे सोशल माध्यम आणि सुरक्षितता हा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे.
स्नॅपचॅट एप्लीकेशन हे एक प्रकारचे मेसेंजर ॲप आहे. त्यातून आपण एकमेकांना फोटो व्हिडिओ हे आपल्या मित्रांना पाठवू शकतो. स्नॅपचॅट एक मेसेजिंग सर्व्हिस आहे. जी त्यास खूप महत्त्व देते वापरकर्त्याची सुरक्षितता सर्व वेळेत संदेश पाठविण्याच्या कार्याद्वारे येते जे प्राप्तकर्त्याद्वारे एकदा आणि निर्दिष्ट सेकंदांमध्ये फक्त एकदाच पाहिले जाऊ शकते. स्नॅप हा स्पॉटवर घेतलेला किंवा आपल्या गॅलरीतून अपलोड केलेला फोटो आहे. आपल्या मित्रांना पाठविला जातो. जेव्हा आपण स्नॅप पाठवाल तेव्हा ते आपल्या मित्राला सुमारे 10 सेकंदासाठी आणि केवळ एकदाच पाहण्यासाठी उपलब्ध असतो, अशी माहिती आहे. आपल्या मित्राने संदेश पाहिला असेल हे आपल्याला कळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो बुद्धिमान आहे, स्क्रीनशॉट घेण्यास यशस्वी झाला असेल तर आपल्याला चेतावणी दिली जाईल.
असा शोधला बग
स्नॅपचॅटमध्ये 'माय आईज ओन्ली' हे फीचर उपलब्ध करून दिले असून यामध्ये सेव केलेले फोटो अन्य कोणाला किंवा सर्वांना न दिसण्याची सुविधा आहे. याला असलेल्या प्रायव्हसी सेटिंगमुळे तरुणाईत हे फीचर खूपच लोकप्रिय ठरले आहे. परंतु याच फीचर मध्ये विशाल सटले यांनी बग शोधला असून हॅकरला ही माहिती स्क्रीनशॉटच्या माध्यमातून आपल्याकडे ठेवता येऊ शकते हे त्यांनी शोधून काढले आहे. वापरकर्त्याला हे समजणारच नसल्यामुळे या फिचरला देण्यात आलेली प्रायव्हसी ब्रेक होत आहे.
अशी घ्या काळजी?
स्नॅपचॅट एप्लीकेशन हे तरुण वयातील मुले व मुली एकमेकांशी चॅट करण्यासाठी व फोटो सेंड करण्यासाठी जे काही घडले आज त्यासाठी वापरतात. हॅकर वन ही साईट बग शोधणाऱ्यांना रिवॉर्ड देते. या वेबसाईटमध्ये मोठ मोठ्या कंपन्या जॉईन आहे. त्यामुळे आपण त्या कंपन्यांची टेस्टिंग करू शकतो. तसेच स्नॅपचॅट एप्लीकेशनचे टेस्टिंग केली तेथून हा बग लक्षात आला. या बगमुळे समोरच्याने पाठवलेला फोटो हा स्क्रीन शॉटद्वारे आपल्याकडे ठेवू शकतो व समोरच्या व्यक्तीला काही कळणार नाही. त्यामुळे प्रायव्हसी ब्रेक होते. जर एका व्यक्तीने समोरच्या व्यक्तीस फोटो सेंड केला आहे, असे समजून की फक्त तो त्यावरच दिसेल आणि तो शेअर होणार नाही. पण या बगमुळे ते होऊ शकते. कंपनीला हे लक्षात घेता ऍप्लिकेशन अपडेट करणे गरजेचे आहे. त्यामुळे जरी या प्रकारे स्क्रीन शॉट घेण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्याला कोणताही त्रास होणार नाही.