Nashik News : नाशिकच्या लालपरीला दिवाळीत धनलाभ, दहा दिवसांत अकरा कोटींची भाऊबीज
Nashik News : नाशिकच्या (Nashik) एसटी विभागाला दिवाळीत अकरा कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
Nashik News : गणेशोत्सव (Ganeshotsav), नवरात्रीनंतर (Navratri) राज्य एसटी महामंडळाला दिवाळी (Diwali) महत्वाची ठरली असून नाशिक विभागाला सुमारे 11 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून महामंडळाची दिवाळी गोड झाली आहे. नाशिक विभागातून नाशिक एक आगाराने सर्वाधिक उत्पन्न मिळवले आहे. तर 15 लाख प्रवाशांची वाहतूक केली आहे.
काेराेनाचे (Corona) निर्बंध हटल्यामुळे दिवाळीच्या 10 दिवसांच्या काळात एसटी महामंडळाच्या (St Bus) बसमधून दीड काेटी प्रवाशांची प्रवास केला. या माध्यमातून एसटीला 11 काेटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. दिवाळीच्या काळात प्राप्त झालेल्या उत्पन्नातून एसटीचा ताेटा कमी हाेण्यास मदत हाेणार आहे. त्याचबराेबर पर्यटनासह धार्मिक ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची यावेळी मोठी गर्दी हाेत आहे.
काेराेना संसर्गाच्या संकटामुळे नागरिक दोन वर्ष दिवाळी साजरी करू शकले नाहीत. परंतु यंदा सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्याने दिवाळी उत्साहपूर्ण वातावरण साजरी करण्यात आली. दिवाळीच्या सुट्टीत गावी तसेच पर्यटनासाठी जाण्याकडे नागरिकांचा कल असतो. यामुळे यंदा राज्य महामार्ग परिवहन महामंडळ देखील प्रवासी वाहतुकीसाठी मोठ्या संख्येने बस उपलब्ध करून दिल्या होत्या. दिवाळी सुट्टीच्या काळात दहा टक्के प्रवासी भाडेवाढ देखील करण्यात आली होती. त्यामुळे महामंडळाला या प्रवासी वाहतुकीतून मोठे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. महामंडळाची एकूण 13 आगार असून त्यांना दिवाळीच्या सुट्टीत दहा कोटी 99 लाख 36 हजार रुपयांची उत्पन्न मिळाले आहे. दिवाळी सुट्टी काळात एकूण 14 लाख 80 हजार 826 प्रवाशांनी लालपरीने प्रवास केला.
नाशिक जिल्ह्यातील आगार आणि त्यांचे उत्पन्न
नाशिक एक दोन कोटी 25 लाख, नाशिक दोन 81 लाख 6 हजार, मालेगाव 89 लाख 3000, मनमाड 57 लाख 13 हजार, सटाणा 95 लाख 32 हजार, सिन्नर 89 लाख 21 हजार, नांदगाव 70 लाख 38 हजार, इगतपुरी 59 लाख 83 हजार, लासलगाव 63 लाख 15 हजार, कळवण 93 लाख 8 हजार, पेट 52 लाख 7 हजार, येवला 54 लाख 51 हजार, पिंपळगाव बसवंत 68 लाख 4 हजार रुपयेइतके उत्पन्न मिळाले आहे.
महामंडळाला 218 कोटी रुपयांचे उत्पन्न
राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने यांना दिवाळीसाठी नियोजन करून प्रवासी वाहतुकीसाठी ज्यादा गाड्या सोडल्या. धुळे विभागाला तब्बल 11 कोटी 52 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने ज्यादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले होते. त्याचबरोबर 21 ते 31 ऑक्टोबर या दरम्यान दहा टक्के भाडे वाढ केली होती. तरीही प्रवाशांकडून एसटीतून प्रवास करण्यास पसंती देण्यात आली. यामुळे एसटीला सन 2019 च्या तुलनेत यंदा विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. संपूर्ण राज्यातील सर्व विभागातून महामंडळाला 218 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात सर्वाधिक वाटा धुळे विभागाचा आहे. धुळे विभागातून 11 कोटी 52 लाख रुपयांची उत्पन्न मिळाले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर जळगाव विभागात 11 कोटी 32 लाख आणि तिसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर विभागातून दहा कोटी 64 लाख रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळालेले आहे.