Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये, निसर्गोपचार केंद्राचे उदघाटन
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले आहेत.
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असून ते नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेझे गावाजवळील निसर्गोपचार केंद्राला (Naturopathy Centre) भेट देणार आहेत. याचबरोबर विवेदा द वेलनेस व्हिलेज या ठिकाणी होत असलेल्या नूतन वस्तू व नैवद्यम रेस्टारंटचे उदघाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर ते एका खासगी कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अनेक दिवसांनंतर नाशिकमध्ये येत आहेत. मात्र हा त्यांचा विशेष दौरा नसल्याने ते पत्रकारांशी संवाद साधतील का नाही याबाबत साशंकता आहे. फडणवीस हे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांच्याबरोबर नाशिक दौऱ्यावर येणार होते, मात्र काही कारणास्तव त्यांचा हा दौरा फिस्कटला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये पहिले वहिले शिंदे गटाचे (Shinde Group) संपर्क कार्यालयाच्या उदघाटनासाठी आले होते. तर दुसरीकडे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये येत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा एका कार्यक्रमासाठीचा असून यामध्ये ते त्र्यंबकेश्वर जवळील एका निसर्गोपचार केंद्राच्या उदघाटनासाठी येत आहेत. आमदार सीमा हिरे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या निसर्गोपचार केंद्राच्या नूतन इमारतीचे उदघाटन होणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या मुलाच्या विवाह प्रसंगी देवेंद्र फडणवीस उपस्थिती लावणार आहेत.