Maharashtra News LIVE Updates : विदर्भात सूर्य आग ओकतोय, नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्याला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा वाचा एका क्लिकवर..
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : मध्य रेल्वेच्या ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर एकाच वेळी महामेगाब्लॉक ॉघेतला जाणार आहे. ठाणे स्थानकात आज रात्रीपासून पुढील 63 तास मेगाब्लॉक असेल, तर सीएसएमटी स्थानकात शनिवारी आणि रविवारी असा 36 तासांचा मेगाब्लॉक असेल. या दोन्ही मेगाब्लॉकमुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तिनही दिवशी मध्य आणि हार्बर मार्गावर एकूण 956 लोकल रद्द केल्या जाणार आहेत. यासोबतच राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा वाचा एका क्लिकवर..
Nashik : नाशिक विभागीय आयुक्त पदी प्रविण गेडाम यांची नियुक्ती
Nashik : नाशिक विभागीय आयुक्त पदी प्रविण गेडाम यांची नियुक्ती
-
कृषी विभागाच्या आयुक्त पदाचा कार्यभार सोडून नाशिक विभागीय आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारण्याचे आदेश
-
प्रविण गेडाम यांनी मागील कुंभमेळा काळात नाशिक महापालिकाचे आयुक्त या पदावर केले होते कामकाज
-
आगामी कुंभमेळाकच्या पार्श्वभूमीवर अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती
-
2002 च्या बॅचचे प्रवीण गेडाम यांनी रेल्वे मंत्र्यांचे सचिव, राज्याचे परिवहन आयुक्त पदाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे
विद्यमानआयुक्त राधाकृष्ण गमे आज निवृत्त होत असल्याने प्रवीण गेडाम यांची करण्यात आली नियुक्ती
Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात महायुतीच्या 45 जागा निवडून येतील - छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ on लोकसभा निकाल..( एक्झिट पोल )..
- महाविकास आघाडीचा पराभव होईल व महायुतीचे मोठ्या संख्येने विजयी होईल..
- महाराष्ट्रात महायुतीच्या ४५ जागा निवडूण येतील...
- दोन-चार जागा चुकुन भाकून महाविकास आघाडीला जातील..
Pandharpur : विठ्ठल मंदिरातील हनुमान गेट जवळ एक छुपी खोली सापडली, आज मंदिर समितीसह पुरातत्व विभाग टीम पाहणी करणार
Pandharpur : विठ्ठल मंदिरातील हनुमान गेट जवळ एक छुपी खोली सापडली आहे
त्यात मूर्ती असल्याची माहिती असून आज मंदिर समिती सह अध्यक्ष औसेकर आणि पुरातत्व विभाग टीम उतरणार ..
काल रात्री 2 वाजता ही छुपी खोली आढळून आली आहे
BJP : लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व ॲक्शन मोडवर, प्रत्येक उमेदवाराकडे मागितला अहवाल
BJP : लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व ॲक्शन मोडवर
राज्यातील भाजपच्या प्रत्येक उमेदवाराकडे मागितला लोकसभा मतदारसंघाचा अहवाल
मतदान कमी का झाले?, कोणत्या भागात किती मतदान झाले, नवीन मतदारांचा भाजपला किती फायदा होईल?, हिंदु मते मिळवण्यात किती यश मिळवले? अशा अनेक मुद्द्यांचा अहवालात आढावा
४ जूनच्या निकालानंतर विधानसभा निहाय विश्लेषण केले जाणार
ज्या आमदारांनी मदत केली नाही, त्यांच्यावर कारवाईची शक्यता
चांगली कामगिरी ने केलेल्या आमदारांचे विधान सभेचे तिकीटही येणार धोक्यात
Chhagan Bhujbal : आता आमच्या महाराष्ट्राचा कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा करावा, छगन भुजबळ कर्नाटक कांदाप्रश्नी पत्रकारांशी संवाद
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ कर्नाटक कांदाप्रश्नी पत्रकारांशी संवाद
- नक्कीच हा महाराष्ट्रावर अन्याय आहे.
- शेजारच्या गुजरातचा सफेद आणि कर्नाटकच्या गुलाबी कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला..
- आता आमच्या महाराष्ट्राचा कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा करावा..
- याबाबत मी फडणवीस याच्याशी बोलणार आहे..