Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेवरील मेगा ब्लॉकबाबत मोठी अपडेट; प्रवाशांच्या रोषानंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Oct 2023 10:28 PM
Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला घेऊन पोलीस पुण्यात दाखल; चौकशीतून कोणती माहिती समोर येणार?
Lalit Patil : पुणे पोलिसांनी आजच ड्रग्स तस्कर ललित पाटीलला मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला घेऊन पोलीस पुण्यात दाखल झाले आहेत. Read More
Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेवरील मेगा ब्लॉकबाबत मोठी अपडेट; प्रवाशांच्या रोषानंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
Mumbai Local Western Railway Block : प्रवाशांमध्ये असलेल्या संतापाची दखल घेता पश्चिम रेल्वेने ब्लॉगबाबत मोठा निर्णय घेतला आहे. एक नोव्हेंबर 2023 आणि दोन नोव्हेंबर रोजी पश्चिम रेल्वेने काही लोकल रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे. Read More
Maharashtra Drought : बारामतीसह 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, तुमच्या तालुक्याचा समावेश आहे का? पाहा संपूर्ण यादी
Maharashtra Drought 2023 : राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यामध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे. पाहा यादी.... Read More
Maharashtra Cabinet Meeting : राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
Maharashtra Cabinet Meeting : महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. Read More
विशेष अधिवेशन बोलवा, केंद्राला प्रस्ताव पाठवा, राज ठाकरेंनी पर्याय सांगितला, मनोज जरांगेंना जाहीर आवाहन
Maratha Reservation: राज ठाकरेंनी मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिकाही मांडली आहे. महत्त्वाचं म्हणजे, राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन भरवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.  Read More
Maratha Reservation Uddhav Thackeray : तब्येत जपा, आम्ही तुमच्यासोबत; उद्धव ठाकरेंची मनोज जरांगेसोबत फोनवरून चर्चा
Uddhav Thackeray Manoj Jarange : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण आणि आमदार अपात्रतेच्या मुद्यावर पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. Read More
मुंबईकरांनो, लक्ष द्या, काटकसरीनं पाणी वापरा! 2 आणि 3 नोव्हेंबरला 'या' भागांत पाणीपुरवठा बंद
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीनं मुंबईतील काही विभागांमध्ये जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर काही भागांत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. Read More
मनोज जरांगेंनी शाहू महाराजांचा मान राखला, महाराज म्हणाले, सरकारला तुमचा शब्द मानावाच लागेल!
शाहू महाराज छत्रपतींनी मनोज जरांगेंची भेट घेतली. सरकारला आपला शब्द ऐकावाच लागेल, शाहू महाराजांचं जरांगेंशी संभाषण, शाहू महाराजांचा मान राखत पुढील 2 दिवस पाणी पिण्यास जरांगे तयार Read More
Maratha Reservation: नारायण राणे ते अजित पवार, कुणाकुणाच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली?
Maratha Reservation: मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर नेते, मंत्री, आमदारांच्या बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. Read More
दोन खासदार, तीन आमदारांचे राजीनामे, मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत कोणी कोणी पद सोडलं?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील 3 आमदार आणि दोन खासदारांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये शिंदे गटाचे 2 खासदार, 1 आमदार, काँग्रेसचा एक आमदार आणि भाजपच्या एक आमदाराचा समावेश आहे.  Read More
मराठा आंदोलनातील तोडफोड प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडमध्ये; संभाजीनगरात पहिला गुन्हा दाखल
Maratha Reservation : मराठवाड्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. याचप्रकरणी छत्रपती संभाजीनंगरात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
मराठा आंदोलनाचा गैरफायदा घेणाऱ्या समाजकंटकांना अटक करा; पोलीस महासंचालकांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
Maratha Reservation : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सोमवारी कायदा आणि सुव्यवस्थेची बैठक पार पडली. तासभर चाललेल्या बैठकीत पोलीस महासंचालकांनी राज्यभरात झालेलं मराठा आंदोलन आणि त्यादरम्यान झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांचा आढावा समोर ठेवला. Read More
Onion Price: कांद्याच्या किमतींत दुप्पट वाढ, केंद्र सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा निर्णय, दर घटणार?
Onion Price Hike: देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याचे भाव झपाट्यानं वाढत असून, याच पार्श्वभूमीवर सरकारनं आणखी एक पाऊल उचललं आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होऊ शकतात. Read More
Belgaum News: महाराष्ट्राचे तीन मंत्री आणि खासदारांना जिल्हाबंदी; बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी
Belgaum News: महाराष्ट्राचे तीन मंत्री आणि खासदारांवर बेळगाव जिल्ह्याबंदी घालण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते 2 नोव्हेंबर सायंकाळपर्यंत ही जिल्हाबंदी असणार आहे. Read More
"आता 200 नाही, 400 कोटी द्या, नाहीतर..."; मुकेश अंबानींना तीन दिवसांत तिसऱ्यांदा धमकीचा ईमेल
Death Threat to Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी. यावेळी 400 कोटींच्या खंडणीची मागणी. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.