एक्स्प्लोर

मुंबईकरांनो, लक्ष द्या, काटकसरीनं पाणी वापरा! 2 आणि 3 नोव्हेंबरला 'या' भागांत पाणीपुरवठा बंद

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीनं मुंबईतील काही विभागांमध्ये जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर काही भागांत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

Mumbai Water Supply: मुंबईकरांसाठी मोठी बातमी. मुंबईतील (Mumbai News) काही भागांत 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी काही परिसरात पाणीपुरवठा बंद (Water Supply Cut) राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसेच, दक्षिण मुंबईतील काही रुग्णालयांमध्येही दोन दिवसांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दक्षिण मुंबईतील केईएम रुग्णालय, टाटा, बाई जेरबाई वाडिया, एमजीएम रुग्णालयात पाणीपुरवठा बंद असणार आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीनं मुंबईतील काही विभागांमध्ये जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. या अंतर्गत 900 मिली मीटर व्यासाचा जलद्वार बदलण्याचं तसेच 300 ते 1800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे, गुरुवार, दिनांक 2 नोव्हेंबर 2023 पहाटे 4 वाजेपासून शुक्रवार, दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत एम (पूर्व), एम (पश्चिम), एन, एल, एफ (दक्षिण) आणि एफ (उत्तर) विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहील.

मुंबईतील कोणत्या भागांत पाणीपुरवठा बंद? 

मानखुर्द, चेंबुरमधील काही भागांत पाणीपुरवठा बंद 

मुंबईतील एम/पूर्व विभागात अहिल्याबाई होळकर मार्ग, मंडाला, म्हाडा इमारती, कमलरामन नगर, आदर्श नगर, रमण मामा नगर, जनता टिंबर मार्ट परिसर, लोटस कॉलनी, अब्दुल हमीद मार्ग, जनकल्याण सोसायटी, मानखुर्द, देवनार फार्म मार्ग, बोरबादेवी, पांजारापोळ भागांत पाणीपुरवठा बंद असणार आहे. तर एम / पश्चिम विभागात वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ कॉलनी, लालडोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लालवाडी, मैत्री पार्क, अतूर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर, श्यामजीवी नगर, घाटला, अमर नगर, मोतीबाग, खारदेव नगर, वैभव नगर, एस. टी. मार्ग, सी. जी. गिडवाणी रस्ता, उमरशीन बाप्पा चौक, चेंबूर नाका, चेंबूर बाजार, चेंबूर कॅम्प  परिसरात पाणीपुरवठा बंद असणार आहे. 

घाटकोपरमध्ये पाणीपुरवठा बंद 

एन विभागात घाटकोपर पूर्वेतील राजावाडी पूर्वेकडील संपूर्ण परिसर, चित्तरंजन नगरसह विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, गरोडिया नगर, नायडू कॉलनी, शास्त्रीनगर, गुरुनानक नगर, जवाहर मार्ग, गौरीशंकर मार्ग, रमाबाई नगर, कामराज नगर, नेताजी नगर, चिरागनगर, आझाद नगर, गणेश मैदान पारशीवाडी, गिगावडी, भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, गुन्हे शाखा परिसर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, सीजीएस कॉलनी, गंगावाडी, एमटीएनएल गल्ली, एजीएलआर मार्ग, एलबीएस मार्गालगतचा परिसर घाटकोपर (पश्चिम) श्रेयस सिग्नल इत्यादी पर्यंत. सॅनिटोरियम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, काम गल्ली, श्रद्धानंद रस्ता, जे. व्ही. मार्ग, गोपाळ गल्ली, एलबीएस मार्ग घाटकोपर (पश्चिम), गांधी नगर शेजारील परिसरात पाणीपुरवठा बंद असणार आहे. 

कुर्ला, टिळक नगर, चुनाभट्टी परिसरात पाणीपुरवठा बंद 

एल विभागात नेहरू नगर, शिवसृष्टी मार्ग, नाईक नगर, मदर डेअरी मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग कुर्ला (पूर्व), केदारनाथ मंदीर मार्ग, नवरे बाग, कामगार नगर, पोलीस वसाहत, लोकमान्य टिळक टर्मिनस, टिळक नगर, कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, स्थानक मार्ग, राहुल नगर, एवरद नगर, पानबाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अलीदादा मार्ग, स्वदेशी जेवण चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडाकोळ प्रेम नगर, हिल रोड, मुक्तता देवी मार्ग, ताडवाडी, समर्थ नगर - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

सायन, माटुंगा, दादरमध्ये पाणीपुरवठा बंद 

एफ/उत्तर विभागात शीव पश्चिम आणि पूर्व, दादर (पूर्व), माटुंगा (पूर्व), वडाळा, चुनाभट्टीचा भाग, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, अल्मेडा कंपाऊंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, लोढा इमारती (नवीन कफ परेड), शीव कोळीवाडा-सरदार नगर, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, कोरबी मिठागर, वडाळा भागांत पाणीपुरवठा बंद. 

लालबाबग, परळ भागांत पाणीपुरवठा बंद 

एफ/दक्षिण विभागात शिवडी, लालबाग, परळ गाव, परळ, काळेवाडी, नायगाव, कॉटन ग्रीन, मिंट कॉलनी, दत्ताराम लाड मार्ग, अभ्युदय नगर भागांत पाणीपुरवठा बंद असणार आहे. 

महापालिका प्रशासनाचं आवाहन 

त्यामुळे या भागातील लोकांना पाणीपुरवठा खंडित होण्याच्या एक दिवस आधीच योग्य आणि मुबलक पाणीसाठा भरुन ठेवावा असं आवाहन केलं आहे. तर या भागामध्ये पहाटे चार वाजल्यापासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा हा पूर्णपणे बंद राहिल. तर पाणीकपातीच्या कालावधीमध्ये काटकसरीनं पाणी वापरण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. त्यासाठी नागरिकांनी योग्य सहकार्य करण्याची विनंती देखील यावेळी महानगरपालिका प्रशासनाने केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Embed widget