एक्स्प्लोर

Raj Thackeray: विशेष अधिवेशन बोलवा, केंद्राला प्रस्ताव पाठवा, राज ठाकरेंनी पर्याय सांगितला, मनोज जरांगेंना जाहीर आवाहन

Maratha Reservation: राज ठाकरेंनी मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिकाही मांडली आहे. महत्त्वाचं म्हणजे, राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन भरवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. 

Raj Thackeray on Maratha Reservation: एकिकडे राज्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत, तर दुसरीकडे मराठा आंदोलनाला राज्यभरात हिंसक वळण लागलं आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनोज जरांगेंना उद्धेशून पत्र लिहिलं आहे. तसेच, या पत्रातून राज ठाकरेंनी मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिकाही मांडली आहे. महत्त्वाचं म्हणजे, राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन भरवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपलं पत्र ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, "मी ह्या पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो की, त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं 'विशेष अधिवेशन' भरवावं. सगळ्यांना कळू दे की कुणाचं काय म्हणणं आहे ते. सगळ्यांना हे ही कळू दे की शासन कुठल्या कायद्यात, नियमांत बसवून हे आरक्षण देणार आहे. ह्या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा."

राज ठाकरेंची उपोषण थांबवण्याची जरांगेंना विनंती 

राज ठाकरे आपल्या पत्रात पुढे म्हणाले आहेत की, "तोपर्यंत विनंती अशी की, तुम्ही तुमचं उपोषण थांबवावं. समाज-समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी मिळून एक चांगला, कायमस्वरूपी तोडगा काढावा ह्यासाठी एकत्रपणे आपण काम करू. तुमच्या ह्या कामात मी आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहोतच. परंतु ह्या निगरगट्ट, असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वत:च्या जीवाची बाजी लावू नये इतकी माझी इच्छा. ही लढाई मोठी आहे ती आपण खांद्याला खांदा लावून लढू. सगळेच मुद्दे असे रेंगाळत पडणं बरोबर नाही. त्यांच्या थापा विसरून पुन्हा पुन्हा त्याच त्याच पक्षांना निवडून दिल्याचा हा परिणाम आहे. मग ते आपला गैरफायदा घेत रहातात. हे बदललं पाहिजे. आपण सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. 'सर्व मराठी एक' असा विचार केला पाहिजे. तसा केला तर आणि तरच आपण महाराष्ट्रात सुख, शांती निर्माण करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभवशाली शिखरावर नेऊ शकू."

उपोषण सोडा, तब्येत जपा; राज ठाकरेंचं मनोज जरांगेंना आवाहन 

राज ठाकरेंनी आपल्या पत्राचा शेवट करताना पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांना आपलं उपोषण थांबवण्याची विनंती केली आहे. राज ठाकरे म्हणाले आहेत की, "पत्र संपविण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती, "उपोषण सोडा. तब्येत जपा. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Raj Thackeray: जरांगेंच्या उपोषणाच्या सातव्या दिवशी राज ठाकरे मैदानात, पत्र लिहून मनोज जरांगेंना मोठं आवाहन!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
गौतम गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गौतम गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Embed widget