Nitesh Rane On Rohit Pawar : अमेरिकेत कुठला मुलगा जन्माला आला की रोहित पवार म्हणतील हा माझाच मुलगा; नितेश राणेंची बोचरी टीका

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Oct 2023 10:42 PM
Dasara 2023 : रावण दहन करणाऱ्या व्यक्ती किंवा मंडळावर होणार गुन्हे दाखल; प्रशासनाने पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
Dasara 2023 : देशभरात हिंदू धर्मीय रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करतात. मात्र, यंदा आदिवासी बांधवांनी रावण दहनासविरोध केला आहे. भंडारा जिल्ह प्रशासनाचे रावण दहनास मनाईचे पत्र व्हायरल होत आहे. Read More
Nitesh Rane On Rohit Pawar : अमेरिकेत कुठला मुलगा जन्माला आला की रोहित पवार म्हणतील हा माझाच मुलगा; नितेश राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane On Rohit Pawar : अमेरिकेत कुठला मुलगा जन्माला आला की रोहित पवार म्हणतील हा माझाच मुलगा आहे. स्वतःला जगत गुरु कोणी समजू नये असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला. Read More
Washim Rain : मुसळधार पाऊस झाला पण कोणालाच नाही दिसला; पर्जन्यमापक यंत्रात पाणी टाकून दर्शविली अतिवृष्टी
Washim Rain : वाशीम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला पण कोणालाच दिसला नाही, असा प्रकार समोर आला आहे. अतिवृष्टी दाखवण्यासाठी काहींनी पर्जन्यमापक यंत्रात पाणी टाकले असल्याचा प्रकार समोर आला आहे. Read More
Aditya Thackeray : दसऱ्यानंतर आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाणार; नितेश राणेंचा मोठा दावा
Nitesh Rane On Aditya Thackeray : नितेश राणे यांनी सातत्याने सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान या आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले होते. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे. Read More
Sharad Pawar Prakash Ambedkar : शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट म्हणजेच शुभ संकेत; काँग्रेस नेत्यांचे सूचक वक्तव्य
Sharad Pawar Prakash Ambedkar : काँग्रेसने शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर शुभ संकेत असल्याचे म्हटले. Read More
Buldhana : लोणार सरोवराकाठी भाविकांना स्नान पुन्हा सुरू करण्याची मागणी; पुरातत्व विभागाची बंदी मोडून आंदोलकांनी केलं स्नान
Lonar Lake Buldhana : स्थानिक संघटना तसेच भाविकांच्यावतीने अनेकदा निवेदने देऊन ही बंदी मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पुरातत्व विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. Read More
Government Employee Strike : जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा आंदोलनाची हाक; संघटनांच्या आजच्या बैठकीत काय ठरलं?
Maharashtra Government Employee Strike : जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. Read More
Congress : भाजपने आंदोलनाची नौटंकी करण्यापेक्षा CM शिंदे, अजित पवारांना माफी मागायला सांगावीः नाना पटोले
Nana Patole On Devendra Fandnavis : आंदोलनाची नौटंकी बंद करून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. Read More
Devendra Fadnavis : फडणवीसांनी विदर्भात जे विकास कामांचे दिवे लावले त्यावर चर्चेची गरज; पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला
Prithviraj Chavan On Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात ज्या विकास कामांचे दिवे लावले आहेत, त्यावर चर्चेची अधिक आवश्यकता असल्याचेही चव्हाण म्हटले. Read More
Vinayak Mete : विनायक मेटे यांच्या पुतण्याने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं, कारण अद्याप अस्पष्ट
Vinayak Mete Beed : शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. Read More
शरद पवारांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल, म्हणाले उपमुख्यमंत्रिपदही कंत्राटी पद्धतीनं द्या
Sharad Pawar and Prakash Ambedkar: शरद पवारांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्ला चढवला आहे. उपमुख्यमंत्री पदही कंत्राटावर द्या, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला आहे.  Read More
Aamir Khan: आमिर खान मुंबई सोडून 'या' शहरात होणार शिफ्ट; 'मिस्टर परफेक्शनिस्ट' का घेतोय मायानगरी सोडण्याचा निर्णय? जाणून घ्या कारण
Aamir Khan: आमिर हा लवकरच मुंबई सोडून दुसऱ्या शहरात शिफ्ट होणार आहे.आमिर हा मुंबई सोडण्याचा का निर्णय घेत आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल.   Read More
हा पहिला आणि शेवटचा लढा, आरक्षण मिळालंच पाहिजे, इतक्या ताकदीनं लढा लढायचाय : मनोज जरांगे

मनोज जरांगे अकलुजच्या सभेत काय म्हणाले? 



  • अकलुजमधील मराठा बांधवांना जय शिवराय...

  • आपल्या जातीवर अन्याय होतोय म्हणून आपण एकजुट झालो...

  • मुलं नोकरी, उच्च शिक्षणापासून वंचित राहीले नाही पाहिजे...

  • सावलीत बसलेल्यांनी समोर येऊन बसा... आपलं ग्राऊंड पुर्ण भरलं पाहिजे...

  • आडमुठे, आपण एकत नाही.. असं बदनाम केलय

  • शांततेत आरक्षणाचा लढा सुरु झाला.. आजपर्यंत सुरु आहे...

  • सगळ्याला पोसले तेच आज आपल्याला डाग लावतात... आता त्यांचाच नंबर आहे... 

  • आरक्षणाच्या विरोधात बोलला तर सुट्टीच नाही...

  • 55 पेक्षा जास्त मराठा बांधवांनी बलिदान दिलय.. त्यांची मुलं उन्हात पडली आहेत त्यांच्यावर मायेचं छत्र ठेवावं लागणार आहे

  • हा पहिला आणि शेवटचा लढा,आरक्षण मिळालच पाहिजे इतक्या ताकदीने लढा लढायचा आहे 

  • आरक्षणासाठी मराठा समाजाला मागास सिद्ध असणं गरजेचं आहे. 

  • गायकवाड समितीने 12- 13 टक्के 

  • एका दिवसांत कायदा करता येऊ शकतो

  • विदर्भात कुणबी प्रमाणपत्र मिळतय. म्हणून आपल्यालाही ते हवं आहे

  • आपले आजोबा- पणजोबा शेतीला कुणबी म्हणायचा.. 

  • पुर्वी पायताण म्हणायचे... आता चप्पल म्हणतात..

  • ज्यांना नको त्यांनी घेऊ नका.. ज्यांनी मिळेल त्या गोर गरिबांतचं कल्याण होईल..मराठ्यांचं हक्काचं आहे.. 

  • मराठा समाजातील वरिष्ठ तिम्ही आदर्श आहात... तुम्ही विरोध करु नका 

बेडरुमच्या मधोमध पलंग, नवदाम्पत्याने पकडापकडी खेळायची का? : राज ठाकरे
MNS Chief Raj Thackeray: याशिवाय महाराष्ट्रातील सर्किट हाऊस बघितली तर मोठं मोठी बाथरुम असतात, तिथे पळत पळत आंघोळ करायची का, असा टोमणा राज ठाकरे यांनी लगावला. Read More
पुणे-दिल्ली विमानात भलताच प्रकार, आधी छातीत कळ आल्याची तक्रार, नंतर म्हणाला, माझ्या बॅगेत बॉम्ब, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग!
Mumbai Pune News: पुणे-दिल्ली विमानातून (Pune Delhi Flight) प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं विमानतळ पोलिसांना पळता भुई थोडी केली. Read More
Maharashtra Assembly Winter Session 2023: अवघ्या 10 दिवसांत हिवाळी अधिवेशन गुंडाळणार? तात्पुरतं वेळापत्रक जाहीर, 7 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत अधिवेशनाचं कामकाज
Maharashtra Assembly Winter Session 2023: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरला गुंडाळणार?

7 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान दहा दिवसाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर Read More
Thane News: ठाण्यातील मनोरुग्णालयाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट?
Thane News: ठाण्यातील मनोरुग्णालयाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट तर नाही ना? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पण का? ते सविस्तर जाणून घेऊयात... Read More
MH CET 2024 Updates: महाराष्ट्र CET परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 16 एप्रिल ते 2 मे दरम्यान परीक्षा
MH CET 2024 Exam Dates: महाराष्ट्र सीईटी परीक्षेच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 16 एप्रिल ते 2 मे या कालावधीत परीक्षा होणार आहे. Read More
Sanjay Pandey Meet Uddhav Thackeray: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, कारण गुलदस्त्यात
Sanjay Pandey meet Uddhav Thackeray: मुंबईची माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली असून कारण मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.