Amir Khan Girlfriend : आमीर खानने त्याच्या 60 व्या वाढदिवसादिवशी त्याची नवीन गर्लफ्रेन्ड गौरी स्प्रॅटची ओळख करून दिली आणि त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. गौरी ही आमीर खानची तिसरी गर्लफ्रेन्ड असून हे दोघेही गेल्या दीड वर्षांपासून एकत्र राहत आहेत. गौरीला सहा वर्षांचा मुलगा आहे आणि ती आमीर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्येच काम करते. आमीरच्या या नव्या नात्याला त्याच्या मुलांनी आणि कुटुंबीयांनीही मान्यता दिली असल्याची माहिती स्वतः आमीर खानने दिली आहे.
आमीर खानने 1986 साली रिना दत्ता हिच्याशी लग्न केलं. तिच्यापासून त्याला दोन मुले आहेत. 16 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. आमीरने नंतर किरण राव सोबत लग्न केलं आणि तिच्यापासून त्याला एक मुलगा आहे. 2021 साली किरण राव आणि आमीर खान हे वेगवेगळे झाले. त्यांच्यात कोणतेही मतभेद नसून त्यांनी कौंटुंबिक नाते जपलेलं आहे.
गौरी स्प्रॅटसोबतच्या संबंधावर आमीर खानने काही खुलासे केले आहेत. हे दोघेही एकमेकांना गेल्या 25 वर्षांपासून ओळखतात आणि गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांसोबत राहतात. गौरी सोबत असताना आपल्याला एकदम मस्त वाटतं असं आमीर खान म्हणतो.
आपल्या या नव्या नात्यावर कुटुंबीयांनी आणि मुलांनी आनंद व्यक्त केला आहे, हे नातं त्यांनी स्वीकारल्याचं आमीर खान म्हणाला. गौरी स्प्रॅट ही एक अँग्लो-इंडियन असून तिचे वडील तामिळ-ब्रिटिश तर आई पंजाबी-आयरिश वंशाची आहे. ती बंगळुरूमध्ये राहते आणि आमिर खानच्या प्रोडक्शन कंपनीत काम करते.
सलमान आणि शाहरुखसोबत भेट
आमीर खानने त्याच्या नव्या गर्लफ्रेन्डची ओळख या आधीच सलमान आणि शाहरुख खानसोबत करून दिल्याची माहिती आहे. आमीरच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त शाहरुख आणि सलमान खान एकत्र भेटल्याची माहिती आहे. दरम्यान, आमीर खान आणि सलमान खान हे त्यांच्या 'अंदाज अपना अपना' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात एकत्र काम करणार आहेत.
आमिरच्या वैवाहिक आयुष्यातील प्रवास
आमिर खानने याआधी दोन वेळा विवाह केला आहे. 1986 मध्ये त्याने पहिल्या पत्नी रीना दत्त हिच्याशी लग्न केले होते. मात्र, 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2005 मध्ये त्याने किरण रावशी दुसरे लग्न केले, परंतु 2021 मध्ये त्यांचेही लग्न संपुष्टात आले. आता गौरीसोबतच्या नात्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.
ही बातमी वाचा: