Thane News: ठाण्यातील मनोरुग्णालयाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट?
Thane News: ठाण्यातील मनोरुग्णालयाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट तर नाही ना? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पण का? ते सविस्तर जाणून घेऊयात...
![Thane News: ठाण्यातील मनोरुग्णालयाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट? Thane mental hospital Plot Builder will usurp doubt present Know all updates Thane News: ठाण्यातील मनोरुग्णालयाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/21/b00f37aea85b4493b11602e437133d78169785985240388_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Thane News Updates: ठाणे मनोरुग्णालयाची (Regional Mental Hospital, Thane) झोपडपट्टीनं व्यापलेली जागा एसआरएसाठी (SRA) देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. या संदर्भातील प्रतिज्ञापत्र ठाणे मनोरुग्णालयाचे मेडिकल सुप्रीटेंडंत डॉ. नेताजी मुळीक यांनी हायकोर्टासमोर सादर केलं आहे. मनोरुग्णालयाच्या जागेवर धर्मवीर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि सप्तशृंगी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अशा दोन सोसायटी असून त्या सोसायटीच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून ही जागा बिल्डरच्या घशात तर घातली जात नाही ना? अशी शंका सध्या उपस्थित होत आहे.
2015 साली कोर्टानं दिलेल्या निकालात सदर जागेवर असलेल्या झोपड्या हटवून ती जागा आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यात यावी, असं स्पष्टपणे नमूद केलं होतं. 2020 साली याच निकालाचा आधार घेत तेव्हाच्या मुंबई सर्कलच्या आरोग्य विभागाच्या डेप्युटी डायरेक्टर डॉ. गौरी राठोड यांनी या अनधिकृत झोपड्या असलेली जागा ही मनोरुग्णालयाच्या नव्या इमारतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असं प्रतिज्ञापत्र हायकोर्ट सादर केलं होतं, मात्र आताचे डॉक्टर नेताजी मुळीक यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं, त्यात या अनधिकृत झोपड्या नवीन इमारतीच्या आसपास देखील येत नाहीत, असं नमूद केलं आहे.
2023- 24 च्या अर्थसंकल्पात ठाणे मनोरुग्णालयासाठी आणि कोल्हापूरसाठी 800 कोटींची तरतूद केली आहे. मात्र जर एसआरएसाठी जागा दिली गेली, तर यातील ठाणे मनोरुग्णालय नेमकं कुठे होणार आणि कधी होणार हा मोठा प्रश्न आहे. ठाणे मनोरुग्णालयाकडे एकूण 73 एकर जागा होती, मात्र त्यापिकी 14.30 एकर जागा आधीच नवीन ठाणे स्टेशनसाठी दिली गेली आहे. तर, 5 एकर जागा सामाजिक संस्थांना दिली आहे. काही जागा उद्यानं बनवण्यासाठी दिली आहे, तर आता अनधिकृत झोपड्या असलेली जागा देखील एसआरएसाठी देण्यात येणार असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे सोसायटीच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून ठाण्यातील मनोरुग्णालयाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट तर घालण्यात येत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)