Sambhaji Bhide: स्वातंत्र्यदिन आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; काँग्रेसची मागणी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

प्राची आमले, एबीपी माझा Last Updated: 27 Jun 2023 08:44 PM
Jalgaon News: मोठी बातमी! खान्देशसाठी जळगावला स्वतंत्र विभागीय आयुक्तालय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Jalgaon: खान्देशातील विभागीय आयुक्त कार्यालयाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. Read More
Sambhaji Bhide: स्वातंत्र्यदिन आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; काँग्रेसची मागणी
Sambhaji Bhide: भारताचा स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रगीताबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. Read More
Karni Sena: करनी सेना महाराष्ट्र अध्यक्ष अजय सेंगर यांना मारहाण; आंबेडकरी अनुयायांनी मारहाण केल्याचा आरोप
Karni Sena Maharashtra: संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी करनी सेनेचे अजय सेंगर यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. Read More
Shiv Sena:  मिस्टर फडणवीस तुम्ही गृहमंत्री असाल तर आम्ही शिवसैनिक आहोत; संजय राऊत यांचा इशारा
Shiv Sena Sanjay Raut: मिस्टर फडणवीस तुम्ही गृहमंत्री असाल तर आम्ही शिवसैनिक आहोत असा इशारा संजय राऊत यांनी दिला.  Read More
ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली

ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, अशी माहिती सूत्रांनी माझाला दिलीय. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार होता. त्यामुळे आता ठाकरे गटाने शिष्टमंडळ पोलिसांची भेट घेणार असल्याचं कळतंय.

Nashik Rain Update : नाशिकसह जिल्ह्यात आज यलो अलर्ट; अधून-मधून हलक्या सरींची बरसात, शेतकऱ्यांना दिलासा   
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. Read More
Mumbai Crime News: ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरात घुसून पुतणीवर हल्ला; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे धावले मदतीला
Mumbai Crime News: ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांच्या घरात घुसून अज्ञातांना त्यांच्या पुतणीवर हल्ला केला केला. Read More
Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी चिंचोलीला मुक्कामी, आज श्रींचे चंद्रभागेच्या तीरी स्नान; उद्या पंढरपुरात पोहचणार 
Ashadhi Wari : संत मुक्ताबाईंची पालखी काल पंढरपुरात दाखल झाली, त्यांनतर आज निवृत्तीनाथांची पालखी चंद्रभागेच्या तीरी पोहचणार आहे.  Read More
संभाजीनगरच्या पिशोरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत, हातात काठी घेऊन घराबाहेर निघण्याची वेळ; आतापर्यंत 15 जणांना चावा
Chhatrapati Sambhaji Nagar : परिसरात सध्या प्रचंड भीतीचे वातावरण आहे. तर या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीक करत आहे.  Read More
Nandgoan Police : पोलिसांच्या हातावर तुरी, पोलिसांच्या समोरच पोलीस स्टेशनमधून संशयित फरार, नांदगाव येथील घटना 
Nandgoan Police : नांदगाव पोलिसांच्या हातावर तुरी देऊन संशयिताने पोलीस ठाण्यातून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. Read More
Pune Crime news : भावी अधिकारी गुन्हेगारीच्या गर्तेत? पुण्यात दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; MPSC करणाऱ्या तरुणीवर मित्राचा कोयत्यानं हल्ला
पुण्यात आज दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली.  एम पी एस सी करणाऱ्या तरुणीवर एम पी एस सी करणाऱ्या तिच्या मित्राने सदाशिव पेठेत कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली.   Read More
Palghar News: मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या अन् शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार; पालघरमध्ये जीव मुठीत घेऊन विद्यार्थी गिरवतायत शिक्षणाचे धडे
Palghar News: पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील बालापूर पाटील पाडा येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा आहे. या शाळेत 85 विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळेची एक इमारत कोसळली आहे. Read More
Nashik Accident : निफाडच्या शिरवाडे गावावर दुःखाचा डोंगर, तीन मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, बसचालक फरार 
Nashik Accident : निफाड (Niphad) तालुक्यात बस आणि मोटरसायकल अपघातात तीन शिवसैनिकांचा (Shivsanik) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. Read More
Dharashiv News: एबीपी माझा इम्पॅक्ट; धाराशिवमधील कंत्राटदाराच्या मजुरांवरील मुजोरीच्या बातमीची राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडून दखल
Maharashtra Dharashiv News: राज्याचे मुख्य सचिवांकडून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. चार आठवड्यांच्या आत पोलीस महासंचालकांनाही तपशिल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  Read More
Nashik Accident : एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तीन शिवसैनिकांचा मृत्यू, निफाड तालुक्यातील घटना 

Nashik Accident : निफाड तालुक्यातून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. शिरवाडे (वणी) फाटा येथे बस आणि मोटरसायकल अपघातात तीन शिवसैनिकांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार 26 जून रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान घडली आहे. युवा सेना निफाड तालुका उपप्रमुख सुभाष माणिकराव निफाडे, शिवसैनिक महेश चंद्रकांत निफाडे, नितीन भास्करराव निफाडे यांचे अपघातात निधन झाले. या घटनेमुळे आज शिरवाडे वणी गाव आणि शिरवाडे फाटा बंद ठेवणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज शिरवाडे (वणी) येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

Nanded News : व्हॉट्सअॅप चॅटवरून वाद झाला, शिवसैनिकावर सहा जणांनी प्राणघातक हल्ला केला
Nanded News : दरम्यान या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
Darshana Pawar Murder Case :आधी कंपासमधीस कटरनं वार नंतर घातला डोक्यात दगड, दर्शना पवार हत्याकांडात थरकाप उडवणारी घटना समोर
Darshana Pawar Murder Case: दर्शनाची हत्या करण्याचा माझा हेतू नव्हता, रागाच्या भरात माझ्या हातून हा गुन्हा घडला, असा दावा राहुलनं केला आहे. Read More
Pandharpur News: भगीरथ भालके आज हजारो समर्थकांसह बीआरएसमध्ये प्रवेश करणार, राष्ट्रवादीकडून तातडीची डॅमेज कंट्रोल बैठक
भालके याना मानणारा फार मोठा वर्ग पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात असल्याने त्यांच्यासोबत हजारोच्या संख्येने पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते बीआरएस मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भालके समर्थक करत आहेत . Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान  


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान होणार आहे पालखी प्रस्थान दु. 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे.  यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि स्थानिक खासदार-आमदार उपस्थित राहणार आहेत.  १९ दिवसांचा प्रवास करून हा पालखी सोहळा २९ जून रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.


आज राष्ट्रावादीचा 25 वा वर्धापन दिन 


   राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनासाठी आज शरद पवार दिल्लीत. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता होईल.  प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारणीतले इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार  आहेत. राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई  विभागीय  राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या  वतीने आज सकाळी  09.30 वाजता मुंबईच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात झेंडावंदनाचा कार्यक्रम  आयोजित केलाय. यावेळी खासदार जयंत पाटील , छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवार उपस्थित राहणार आङेत. 


  नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा


 नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संध्याकाळी 5.30 वाजता जाहीर सभा होणार आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला नांदेडमध्ये सभा घेणार आहेत. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उपक्रमाअंतर्गत नांदेडमध्ये अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अतुल सावे, प्रवीण दरेकर आणि इतर नेते उपस्थित राहतील. या सभेत, मोदी सरकारची कामगिरी अमित शाहा जनतेसमोर मांडणार आहेत. दरम्यान नांदेडच्या मैदानातून अमित शाह कुणावर बरसणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर असतील. सकाळी 11 वाजता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. त्यानंतर भाजप कार्यलयात आढावा बैठक घेणार आहेत.  गेल्या काही दिवसांपासून भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरवात केलीय त्या दृष्टीने नवीन नियुक्त्या केल्यात त्यापासून महाजन याना नाशिकपासून दूर ठेवल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यानंतर महाजन पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.