Howrah Train Accident : पश्चिम बंगालमधील हावडा येथील संत्रागाछी आणि शालीमार स्थानकादरम्यान दोन गाड्यांमध्ये झालेल्या भीषण टक्करमुळे मोठा अपघात झाला. संत्रागाछी-तिरुपती एक्स्प्रेस (रिकामी) संत्रागाछीहून शालीमारच्या दिशेने जात होती. दरम्यान, एक इंजिन साइड लाईनवर दोन बोगी ओढत होते. यानंतर दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात 3 बोगी रुळावरून घसरल्या आहेत.






या अपघातामुळे सलीमार-संत्रागाछी मार्गावरील गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघातानंतर दोन गाड्यांच्या वेळेत बदल करावा लागला. अपघातादरम्यान तिरुपती एक्स्प्रेसचे दोन बोगी आणि दुसऱ्या ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरला. या अपघाताची रेल्वे अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. लवकरच गाड्यांचे कामकाज सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  






जळगावात नुकतीच मोठी दुर्घटना, 13 जण ठार तर 10 जखमी


दरम्यान, चार दिवसांपूर्वीच जळगाव जिल्ह्यात बुधवारी (22 जानेवारी) रेल्वे अपघातात 13 जण ठार तर 10 जखमी झाले होते. ब्रेक लावल्यानंतर पुष्पक एक्स्प्रेसच्या चाकांमधून ठिणग्या निघू लागल्या, त्यामुळे आग लागल्याचे प्रवाशांना वाटले आणि त्यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जीव वाचवण्यासाठी लोकांनी ट्रेनची चेन ओढून रुळांवर उड्या मारायला सुरुवात केली. रेल्वेच्या एका बाजूला असलेल्या कल्व्हर्टच्या भिंतीजवळ काही लोकांनी उडी मारली, तर काही लोक दुसऱ्या बाजूला रेल्वे ट्रॅकवर उतरले. तीव्र वळण लागल्याने समोरून येणारी ट्रेन त्याच्या लक्षातच आली नाही. अशा स्थितीत भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना धडक दिली. रेल्वे बोर्डाच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने अपघाताची चौकशी सुरू केली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना रेल्वेने दीड लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. त्याचबरोबर गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली.


इतर महत्वाच्या बातम्या