Nashik News : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जेलरोड (Jailroad) परिसरात असलेल्या एका आजारी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या मुलीने देखील अंगावर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेतल्याने तिचादेखील दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर बापलेकीचा अंत्यविधी एकाच वेळी काढण्यात आला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जेलरोड येथील भीमनगरच्या पाठीमागे असलेल्या ब्रम्हगिरी सोसायटीमध्ये राहणारे मारुती वाघमारे हे पत्नी, एक मुलगा, विवाहित एक व अविवाहित एक असे कुटुंब एकत्र राहत होते. त्यांच्या विवाहित मुलीचे दसक भागात घराचे बांधकाम सुरू असल्याने ती लहान मुलांसह पित्याच्याच घरात राहत होती.
वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल
गुरुवारी सायंकाळी वाघमारे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या परिवाराने मनपाच्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान घरी असलेल्या त्यांच्या लहान मुलगी प्रीती वाघमारे (२७) हिला ही घटना कळताच तिने घरात असलेल्या एका खोलीत स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतले.
एकाच वेळी निघाली बापलेकीची अंत्ययात्रा
घरात असलेल्या एका लहान मुलीला याबाबत माहिती मिळताच तिने आरडाओरड करीत घरच्यांना सांगितले. यानंतर भाऊ सचिन याने तिला उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले. ती सुमारे 80 टक्के भाजल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान दोन्ही बापलेकीची अंत्ययात्रा शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकास अटक
दरम्यान, इंदिरानगर येथील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्याथ्यर्थाने विनापरवानगी शत्र बाळगल्या प्रकरणी अंबड पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे हस्तगत कारण्यात आली आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या