2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
देशभरात आज 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असून प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि सरकारी संस्थांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा झाला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधाराशिवमधील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढून प्रजासत्ताक दिनी लक्ष वेधलं. यावेळी, हाती लांबलचक तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांची साखळी धाराशिवच्या रस्त्यावर दिसून आली.
अहिल्यानगरमध्ये देशातील सर्वात मोठे मानवी रचनेतील 26 जानेवारी नाव लिहिण्याचा विक्रम येथील शाळेनं आपल्या नावावर केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयात हे सुंदर कल्पक चित्र साकारण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य मडके बी. के. यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले, मानवी रचनेतील भव्य 26 जानेवारी नाव कलाशिक्षक आणि एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांनी साकारले.
या मानवी चित्राची लांबी 220 फूट आणि रुंदी 190 फूट असून क्षेत्रफळ 41,800 स्क्वेअर फुट आहे. या मानवी रचनेतील चित्रात भव्य 225 फूट तिरंगा विद्यार्थ्यांनी हातात धरून फडकवला आहे.
श्री नागेश आणि कन्या विद्यालयामधील 2300 विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि 17 महाबटालियन एनसीसीचे विद्यालयातील एनसीसी कॅडेट, नागेश आणि कन्या विद्यालय सर्व शिक्षक सहभागी आहेत.
हे मानवी रचनेतील नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड साठी पात्र असल्याचे विद्यालयाकडून सांगण्यात आले. 26 जानेवारी हे देशातील सर्वात मोठे नाव म्हणून नोंद होणार असल्याची माहिती विद्यालयाने दिली.
दरम्यान, शाळेनं साकारलेल्या या कलाकृतीचं जिल्हाभरातून कौतुक होत असून या 26 जानेवारीच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.