(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Rain Update : नाशिकसह जिल्ह्यात आज यलो अलर्ट; अधून-मधून हलक्या सरींची बरसात, शेतकऱ्यांना दिलासा
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Nashik Rain Update : दोन दिवसांपासून नाशिक शहरासह (Nashik) जिल्ह्यात मान्सूनच्या सरी कोसळत असून मोठ्या प्रतीक्षेनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात पावसाची शक्यता गृहीत धरून यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मात्र उद्या ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला असून पेरणीच्या कामांना गती मिळाली आहे.
राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस (Rainy Season) बरसत असून जून महिना अखेरच्या टप्प्यात असताना मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने जिल्ह्यात पावसाबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात यलो अलर्ट असून आजही यलो अलर्ट (Orange Alert) असून सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. शिवाय खऱ्या अर्थाने पावसाला सुरवात झाल्याचे चित्र आहे.
उद्या नाशिकसह जिल्ह्यात (Nashik District Rain) हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यात त्रस्त झालेल्या नागरिकांनी काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारीही शहरातील काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत. तर महत्वाचे म्हणजे पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. या पावसामुळं शेती कामांना गती येणार आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीकामांना वेग आला आहे. मात्र अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी लगेचच पेरणीची घाई करू नये, पुरेशी ओल आल्यावरच पेरणीचा निर्णय घ्यावा असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.
अधूनमधून पावसाची बरसात
राज्याच्या विविध भागात पावसानं (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली आहे. राज्याच्या विविध भागात पावसानं (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. शहरात पाऊस होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आजही सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे, तर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे. आज राज्यात हवामान विभागानं (IMD) मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज कोकणसह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात चांगाल पाऊस सुरु झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. या पावसामुळं शेती कामांना गती येणार आहे