Malegaon Rain: मालेगावसह परिसरात दमदार मान्सूनपूर्व मोसमी पावसाची हजेरी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Jun 2023 10:12 PM
Maharashtra News: चंद्रपूर जिल्ह्यात मनसेला मोठा धक्का, मनसेच्या तिकिटावर 2019 ची निवडणूक लढलेले रमेश राजूरकर यांना भाजपच्या वतीने विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात मनसेला मोठा धक्का बसलाय. वरोरा विधानसभा क्षेत्रात मनसेच्या तिकिटावर 2019 ची निवडणूक लढलेले रमेश राजूरकर यांना भाजपच्या वतीने विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 13 जून रोजी राजूरकर यांचा भाजप प्रवेश होणार माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केलेल्या विधानसभा प्रमुखांच्या यादीत रमेश राजुरकर यांचे नाव झळकले आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर 2022 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रमेश राजूरकर यांच्या वरोरा येथील निवासस्थानी भेट दिली होती. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली मृत्यूनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बदललेली राजकीय समीकरणे बघता भाजपने नवा डाव टाकल्याचे चित्र दिसत आहे. 

Malegaon Rain: मालेगावसह परिसरात दमदार मान्सूनपूर्व मोसमी पावसाची हजेरी

- मालेगावसह परिसरात दमदार मान्सूनपूर्व मोसमी पावसाची हजेरी.
- वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी.
- उकाड्याने हैराण मालेगावकरांना काहीसा दिलासा...
- पूर्व मशागतीच्या कामांना लागणार ब्रेक ...
- पेरणीलायक पावसाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा.

Dharashiv : क्रूर सीरियल बलात्कारी आरोपीस धाराशिव कोर्टाने सुनावली आजन्म कारावासाची शिक्षा

सिरियल बलात्कारी आरोपीस सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून व्हिडीओ केल्याप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा आणि आर्थिक दंड ठोठावला आहे.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांच्या कोर्टाने ही शिक्षा सुनावली.

अंकुश वडणे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असुन त्याने आजवर 4 अल्पवयीन मुलीवर आणि इतर 3 अत्याचाराचे असे 7 गुन्हे केले आहेत

त्याला दोन वेळेस कोर्टाने यापूर्वी शिक्षा सुनावली आहे.

शिक्षा भोगून आला की तो पुन्हा लहान मुलीवर बलात्कार करायचा. यापूर्वी त्याने 4, 8, 10 व 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे.

Sangli News: सांगली: जत तालुक्यातील उमदी मध्ये दुष्काळी भागातील तरुण तरुणींचा अनोखा विवाह सोहळा संपन्न...तब्बल 35 जोडप्याचा विवाह संपन्न
Sangli News: सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळ भागातील  तरुण तरुणींचा अनोखा विवाह सोहळा उमदीमध्ये पार पडला. तब्बल 35 जोडप्याचा विवाह या ठिकाणी पार पडला. उमदीमधील संजय तेली युथ फाऊंडेशनच्यावतीने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अनोख्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावत वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.
Parbhani News: दुचाकी चोरणारी टोळी परभणी पोलिसांच्या ताब्यात; चौघांना अटक

Parbhani News: परभणीसह इतर जिल्ह्यात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला परभणी पोलिसांच्या विशेष पथकाने पकडले आहे. पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेल्या 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही टोळी मोठ्या शिताफीने दुचाकी चोरी करून इतर जिल्ह्यात विक्री करत होती. 

Lalbaugcha Raja: संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न; आता आतुरता बाप्पाच्या आगमनाची!
Lalbaugcha Raja Padya Pujan: ​चतुर्थीच्या मुहूर्तावर लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला आहे. यंदा लालबागच्या राजाचं 90वं वर्ष आहे. Read More
Pune political News : शिवसेनेच्या कोट्यात असलेल्या शिरूर लोकसभेवर भाजपचा डोळा; 'या' आमदाराने ठोकले शड्डू
पुण्याच्या शिरूर लोकसभेसाठी भाजपकडून आमदार महेश लांडगेनी शड्डू ठोकले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान खासदार अमोल कोल्हेच पक्षाचे उमेदवार असतील, असं म्हटले जात आहे. Read More
Bhandara : भंडाऱ्यात अवकाळी पावसाच्या आगमनानं वातावरणात गारवा

Maharashtra News : नवतपापासून कडक उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. उष्णतेमुळे नागरिकांसह वन्य प्राण्यांचीही मोठी फरफट होताना दिसून येतल आहे. आज सकाळपासूनच कडक ऊन आणि अति उष्ण लहरी सुरू असताना दुपारी अचानक वादळी वारा आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेले तात्पुरते डिवाइडर कोलमडून पडल्याचं चित्र बघायला मिळालं.

Pandharpur: आषाढीला येणाऱ्या 20 लाख वारकऱ्यांची होणार आरोग्य तपासणी! आषाढीमध्ये राज्य सरकारचा अभिनव उपक्रम
Maharashtra News: आषाढीमध्ये पंढरपूरला येणाऱ्या 20 लाख वारकऱ्यांची आरोग्य तपासणी होणार आहे, राज्य सरकारने हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. Read More
Ashadhi Wari 2022 : पालखी सोहळ्याला जायचंय? मग ही बातमी तुमच्यासाठी, पाहा कशी आहे बसेसची सोय?
Ashadhi Wari: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त वाहतुकीची सोय करण्यासाठी दरवर्षी पुणे पीएमपीएमएलकडून जादा बसेसची सोय करते. Read More
Sant Nivruttinath Palkhi : 'नाथांच्या जयजयकारे गेले रिंगण रंगुनी', सिन्नरच्या दातलीत रंगला पहिल्या रिंगणाचा अनुपम सोहळा 
Sant Nivruttinath Palkhi : संत निवृत्तीनाथांच्या (Ashadhi Ekadashi) पालखीचा 'आनंदाची अनुभूती देणारा, डोळे दिपवणारा नयनरम्य गोल रिंगण सोहळा दातलीत पार पडला. Read More
Cyber Fraud : शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर भामट्याचा डल्ला, पोलिसांनी चक्र फिरवली अन् आरोपीसह रक्कम परत मिळवली
Beed News : बीडच्या सायबर पोलिसांनी मलकापूर येथून एक आरोपीला अटक केली आहे. Read More
Kolhapur Violence: राज्यात तणावाची स्थिती; गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या; काँग्रेसची मागणी, ठाकरे गटानेही साधला निशाणा
Maharashtra Kolhapur Violence: राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. Read More
Ashadhi Wari 2023 : रुक्मिणी आणि संत गजानन या मानाच्या दोन पालख्या हिंगोली जिल्ह्यात, भाविकांचं भक्तीमय वातावरणात स्वागत
शेगावहून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी (Sant Gajanan Maharaj Palkhi) आणि वाशिमहून निघालेली रुक्मिणीची पालखी (Rukmini Palkhi) आज हिंगोली जिल्ह्यात मुक्कामी आहेत.  Read More
Mumbai Crime: हॉस्टेलमधील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही; पीडितेच्या वडिलांची भूमिका
Mumbai Crime Latest Update : मरीन ड्राईव्ह येथील हॉस्टलमधील मुलीच्या हत्येनंतर तिचे कुटुंब अकोल्यातून मुंबईत पोहोचले आहे. Read More
Mumbai Crime : मुंबईतील वसतीगृहातील मुलीच्या हत्येनंतर सरकार अलर्ट मोडवर, राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश
Mumbai Crime Latest Update : राज्यातील वसतीगृहांच्या तपासणीसाठी उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती 14 जून पर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे. Read More
खैरेंनी औकात काढली, भुमरे म्हणाले लोकसभेत दाखवतो'; लोकसभा निवडणुकीवरून शिंदे-ठाकरे गटात वाद पेटला
Chhatrapati Sambhaji Nagar : लोकसभा निवडणुकीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. Read More
Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; आरोग्य मंत्र्यांकडून सूचनांची यादी
Ashadhi Wari: वारीच्या काळातदेखील उन्हाचा तडाखा असल्याने कोणत्याही वारकऱ्याला उन्हाचा किंवा कोणताही वातावरणाचा त्रास होऊ नये आणि वारकऱ्यांचा नाहक बळी जाऊ नये, यासाठी आळंदीत आणि देहूत आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. Read More
Nashik Puja Bhoir : इन्स्टा 'रील'स्टार ते मराठी मालिकांमध्ये अभिनेत्री, शेअर्स घोटाळ्यात नाशिक पोलिसांच्या ताब्यात  
Nashik Puja Bhoir : नाशिकमध्ये (Nashik) इन्स्टा 'रील'स्टारने अनेक नागरिकांना शेअर्स ट्रेडिंगचा माध्यमातून गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.  Read More
Kolhapur: सोशल मीडियातील अफवांना बळी पडू नका; जिल्हाधिकारी, पोलिसांकडून कोल्हापूरवासियांना आवाहन
प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनीही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे.  Read More
Devendra Fadnavis: विरोधकांकडून दंगलीचा इशारा आणि त्याला प्रतिसादाच्या कनेक्शनची चौकशी होणार; फडणवीस यांची माहिती
Devendra Fadnavis: विरोधकांकडून दंगलीबाबत देण्यात येणारे इशारे आणि त्यानंतर होणाऱ्या दंगली याच्या संबंधाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सूतोवाच उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. Read More
Nashik Bribe : शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लाचखोरीचे लोण, शिक्षण विभागातील रेटकार्ड पाहिलंत का? 
Nashik Bribe : शिक्षण विभागात विविध कामांसाठी भ्रष्टाचाराचे रेट कार्ड (Rate Card) असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.  Read More
Lalbaugcha Raja : “आज लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन संपन्न” 

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९० व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थी बुधवार दि. ०७ जून २०२३ रोजी सकाळी ६ः०० वा. मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्सचे श्री.रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेत पार पडले. याप्रसंगी खजिनदार श्री. मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले.

Ahilyadevi Holkar Statue: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उदगीर येथे अनावरण,शहरातून भव्य रॅलीचे आयोजन

आज उदगीर शहरातील अहिल्यादेवी उद्यानामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी धनगर समाजाच्या वतीने उदगीर शहरात ढोल ताशाचा गजर करण्यात आला आहे.वाजत गाजत भंडाऱ्यांची उधळण करीत अहिल्यादेवी उद्यानापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी  माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे  अनावरण करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये जिल्हाभरातून मोठ्या संख्येने समाज बांधवांचा सहभाग होता.

Nashik Majhi Vasundhara : माझी वसुंधरा स्पर्धेत राज्यातून नाशिकची शिरसाठे ग्रामपंचायत पहिली, तब्बल दीड कोटींचा पुरस्कार 
Nashik Majhi Vasundhara : नाशिकच्या शिरसाठे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा स्पर्धेत राज्यात प्रथम मिळवत दीड कोटींचा पुरस्कार मिळवला आहे. Read More
Smartana Patil Pune Crime : डीसीपी स्मार्तना पाटील यांची धडक कारवाई; 12 कुख्यात गुन्हेगार शहरातून हद्दपार
परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी शहरातील विविध भागात गंभीर गुन्हे करणाऱ्या 12 कुख्यात गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. Read More
Air India News: अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं रशियात इमर्जन्सी लँडिंग; मदतीसाठी मुंबईहून विशेष विमान रवाना
Air India News: अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं रशियात इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं आहे. या विमानातील प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष विमान मुंबईहून रशियाला रवाना झालं आहे. Read More
Monsoon: मान्सून लांबण्याची कारणं काय आहेत? यंदा दुष्काळ पडणार?  जाणून घ्या तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 
Monsoon Update: प्रत्येक वर्षीचा मान्सून स्वतःची वेगळी वैशिष्ट्य घेऊन येतो. पण यावेळचा मान्सून थोडा जास्तच वेगळा ठरण्याची शक्यता आहे. Read More
BJP J P Nadda Amit Shah Meeting : अनेक राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार

नवी दिल्लीतून भाजपबद्दल मोठी बातमी आहे. अनेक प्रदेश भाजप संघटनांमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळतायेत. कारण गेल्या दोन दिवसांत भाजपमधले क्रमांक दोनचे नेते अमित शाह, अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि राष्ट्रीय संघटना मंत्री बी.एल.संतोष यांच्यात एकूण ८ तास बैठक झाली. या बैठकीत, अनेक राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलणे, तसंच निवडणुका असणाऱ्या राज्यांमध्ये प्रभारी नेमण्यावर चर्चा झाली. केंद्रीय भाजपमधील अनेक महासचिवांनाही बदलण्याची शक्यता आहे. कारण केंद्रीय नेतृत्व केवळ ३ महासचिवांच्या कामावर खुश असल्याचं कळतंय. दरम्यान, मध्य प्रदेशचं भाजप प्रदेशाध्यक्ष पद तरुण नेत्याकडे सोपवलं जाऊ शकतं, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. 


Read More

Wardha MIDC Fire : वर्ध्यातल्या सेवाग्राम एमायडीसी परिसरात भंगार डेपोला आग ABP Majha

 वर्ध्यातल्या सेवाग्राम एमायडीसी परिसरात भंगार डेपोला आग, आगीत मोठ्या  प्रमाणात भंगाराचं  साहित्य जळून खाक , अग्निशामक दलाच्या  सहाय्याने आग  विझविण्याचे प्रयत्न सुरू , 


Read More


Chhatrapati Sambhaji Nagar : एकतर्फी प्रेमातून भाच्याचा मामाच्या मुलीशी लग्नाचा हट्ट; नकार देताच विकृतीवर उतरला
Chhatrapati Sambhaji Nagar : शेवटी मामाने पोलिसात धाव घेतली आणि 23 वर्षीय भाच्याविरोधातच सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  Read More
Kolhapur Hindu Morcha : कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, छ. शिवाजी चौकात ठिय्या

कोल्हापूर शहरातील सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस लावल्याचे समोर आलं. यावरून कोल्हापूर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. कोल्हापूरच्या छत्रपती महाराज चौकात आज हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला आहे, तसंच शहरात बंदची देखील हाक देण्यात आली आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं जिल्ह्यात जिल्हाबंदीचे आदेश काढले आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे असणार आहे. आजपासून जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपदासाठीचा अंतिम फेरीचा सामना सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे कडवं आव्हान टीम इंडिया समोर असणार आहे. तर, दुसरीकडे दिल्लीतील आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या समर्थनात फोगाट बहिणींच्या बलाली गावात कुस्तीपटूंसाठी महापंचायत होणार आहे. 
Ads by



WTC चा अंतिम सामना 
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा लंडनमधील ओव्हल मैदानावर रंगणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं 10 वर्षांपासून आयसीसीचं कोणतंही विजेतेपद जिंकलेलं नाही, अशा परिस्थितीत अंतिम सामना जिंकणार की नाही याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 



पालखी सोहळा 
-  त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याचा आज सहावा दिवस आहे. पालखी सिन्नर तालुक्यातून जाणार असून दातली गावी आज दुपारी 12 ते दुपारी 2 वाजता दरम्यान रिंगण सोहळा होणार आहे.


- शेगावच्या गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल झाली आहे.  



राष्ट्रीय 
हरियाणा - फोगाट बहिणींच्या बलाली गावात आज महापंचायत. कुस्तीपटू विनेश फोगाट, संगीता फोगाट उपस्थित राहणार



दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सकाळी 10.30 वाजता बैठक होणार



मुंबई 
- शिवसेना ठाकरे गटाकडून आजपासून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेल वर सुरू करण्यात येत आहे 


-   मुंबई-गोवा महामार्गावर (एनएच-66) मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांच्या पार्श्वभूमीवर मुळचे कोकणातील असलेले अॅड. ओवैस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. 


-  राज्यातील एसटी आरक्षणापासून वंचित असलेला समाज ‘धनगड’ की ‘धनगर’ आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी


पुणे  
- जेजुरी विश्वस्त निवडीवर आज धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. सध्या ग्रामस्थांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज 13 वा दिवस आहे. 
- जेजुरी देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांच्या नियुक्तीवरून वाद सुरु असताना या विश्वस्तांन एकत्र येत त्यांची भुमिका पत्रकार परिषदेतून मांडणार आहेत. 


नवी मुंबई 
- तिरुमला तिरुपती देवस्थानम श्री व्यंकटेश्वर स्वामी वारी मंदिर, नवी मुंबई भूमिपूजन समारंभ होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार आहेत
 


अहमदनगर 
- कथित लव जिहाद प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सहा प्रकरण घडल्याच किरीट सोमय्यांचा दावा आहे. 


- भाजप खासदार सुजय विखे पाटलांची पत्रकार परिषद


- शिर्डीमध्ये काँग्रेस विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निळवंडे कॅनॉल पाणी जलपूजन असून संध्याकाळी 4 वाजता सभा होणार 


 सांगली 
- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जत तालुक्यात 55 जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे, सकाळी 11 वाजता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.